मंदिरात बागेत व रेल्वे स्टेशन तसेच रस्त्यावर तुम्हाला लहान मुले भीक मागताना दिसली असतील. कधी कधी आपल्याला अपंग असलेले ,हात पाय नसलेले ,डोळ्यांनी कमी दिसणारे ,कानांनी ऐकू न येणारे, बोलता न येणारे, असे अनेक जण आपल्याला पाहायला मिळतात तसेच या लहान मुलांना व अनेक महिला वृद्धांना पाहून आपल्या मनामध्ये दया भावना जागृत होते आणि आणि त्यांना आपण दहा रुपयांपासून पाच रुपयांपासून ते अगदी ते हजार रुपये पर्यंत लोक त्यांना भीक म्हणून पैसे देत असतात.
हिंदू धर्मशास्त्रानुसार अपात्री केलेले दान आपल्याला मोठ्या पापाचे धनी बनवत असते. अपात्री केलेले दान पातक मानली जाते. दान धर्म करताना ते सत्पात्री करावा. सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजार लहान मुला-मुलींचे अपहरण केले त्यापैकी ११ हजार मुलांचा कुठेच थांगपत्ता लागत नाही.
त्याचबरोबर या लहान मुलामुलींना अपहरण करणाऱ्या टोळीच्या द्वारे मुद्दामून भीक मागण्याच्या व्यवसायांमध्ये अडकवले जाते आणि त्यांना जबरदस्तीने भीक मागण्यास परावृत्त केले जाते. जी मुलं मुली मानवी देह व्यापारास तयार होत नाही अशा लहान मुलींना जबरदस्तीने भीक मागण्यास सांगितले जाते.कधी कधी तर त्यांना शारीरिक इजा करून या व्यवसायामध्ये आणले जाते.
कालांतराने ही लहान मुला मुली मोठे होतात परंतु भीक मागण्याचा व्यवसाय हा कायमस्वरूपी होऊन जातो कारण की त्यांना लहानपणापासून भीक मागण्याची सवय लागलेली असते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतामध्ये तीन लाखापेक्षा जास्त बाल भिकारी आहेत. म्हणून या व्यक्तींना पैसे देण्याऐवजी त्यांच्या आवश्यक तेथे साठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू द्या.
तुम्ही त्यांना खायला-प्यायला अन्नाच्या वस्तू देऊ शकता. पांघरण्यासाठी त्यांना चादर ,ब्लॅंकेट सुद्धा देऊ शकतात म्हणून आज पासून तुम्ही एक संकल्प करू शकता कि भिकाऱ्यांना भीक देऊ परंतु पैसे देणार नाही त्यांना त्यांच्या गरजेच्या आवश्यकतेच्या वस्तू त्यांना जरूर द्या व त्यांच्या मदतीसाठी नेहमी धावून या.
जेणेकरून जी काही नवीन मुलं या व्यवसायामध्ये येणार असतील त्यांचे भविष्य उज्ज्वल होऊ शकेल. काही शहरांमध्ये अशा सुद्धा अनेक संस्था आहेत ज्यांनी या लहान मुलांना भीक मागताना पैसे देण्याची त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूचा पुरवठा केलेला आहे त्यामुळे एक गोष्ट निश्चित आहे की ,राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर लहान मुलांच्या भीक मागण्याच्या संख्येवर कुठेतरी नियंत्रण होऊ शकेल म्हणून तुम्ही सुद्धा यापुढे असे करून एक चांगला प्रयत्न करू शकता. जेणेकरून भीक मागणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होईल की माहीत नाही पण त्यांच्या गरजा पैसे देऊन पूर्ण न करता वस्तूच्या स्वरूपामध्ये तुमची मदत होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.