बडी शोप मसाल्यांचा राजा आहे. बडीशोेप खाल्ल्याने तोंडाला चव येते. जेव्हा आपण कुणाच्या घरी जातो, तेव्हा आपल्याला जेवण झाल्यावर बडीशोप हमखास दिली जाते. बडीशेप खाल्ल्याने आपल्याला चव येतेस त्याचबरोबर तोंडाची दुर्गंधी सुद्धा दूर होते.
जर एखाद्या व्यक्तीला डायरिया झाला असेल तर पाच ते दहा ग्रॅम बडिशोप फळांच्या रसासोबत द्यायची द्यायची. पचन कार्य सुरळीत होण्याकरिता अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून बडिशोप ला मान्यता दिली गेलेली आहे. एखाद्या व्यक्तीला अन्नपचन होत नसेल तर त्या व्यक्तीने जेवण झाल्यानंतर बडीशोप खाल्ल्यास अन्नपचन लवकर होते.
बडीशेप खाल्ल्याने रक्त शुद्ध होते व त्वचा सुद्धा चांगली राहते. बडीशोप आणि खडीसाखर यांचे एकत्रित पावडर बनवून हे मिश्रण सकाळी उपाशीपोटी व रात्री झोपण्याच्या अगोदर एक चमचा खाल्ल्यास व्यक्तीची स्मरणशक्ती चांगली राहते व मेंदू तेज बनतो.
जर तुम्हाला खूपच खोकला झाला असेल तर अशावेळी बडीशोप पाण्यामध्ये उकळूनपाणी प्या , असे केल्याने खोकला लगेच दूर होतो. बडिशोप सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे तोंडाची दुर्गंधी दूर करणे होय.जर उलटी थांबत नसेल तर एक ग्लास पाण्यामध्ये बडीशोप टाकून ते पाणी उकळून घ्या आणि त्यात थोडेसे मध मिसळा व हे पाणी प्यायल्यास उलटी थांबते.
जर तुम्हाला वारंवार तोंड येण्याची समस्या होत असेल तर अशा वेळी तुमच्या साठी रामबाण उपाय ठरत असतो. बडीशेप चे पाणी द्वारे गुळण्या केल्याने तोंड येण्याची समस्या लवकर नाहीशी होते. त्याचबरोबर बडीशोप मध्ये अनेक जीवनसत्व व पोषकतत्व असल्यामुळे आयुर्वेदीक शास्त्र मध्ये व आरोग्यशास्त्र मध्ये विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.