नमस्कार मित्रांनो,
जून महिन्यात नवग्रहांचे अतिशय महत्वाचे असे स्थान बदल आणि राशी परिवर्तन होताना पाहायला मिळत आहेत. नवग्रहांमध्ये छाया ग्रह मानल्या गेलेल्या राहू केतूचा ही समावेश आहे. जर दोन्ही छाया ग्रह असले तरी यांच्या राशी परिवर्तनाला तितकेच महत्व आहे. चला तर जाणून घेऊ या जून मध्ये होणाऱ्या या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा नक्की कोणत्या राशींना फायदा होणार आहे आणि धन लाभ होणार आहे.
आताच्या घडीला राहू मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजमान आहेत. तर केतू शुक्राचे स्वामित्व असलेल्या तुला राशीत आहेत. विशेष म्हणजे राहू आणि केतू वक्री चलनाने राशी बदल करत असतात. सुख-समृद्धी कारक मानला गेलेला शुक्र ग्रह सुद्धा सध्या मेष राशीत विराजमान आहेत. तसेच राहू कृतिका नक्षत्रातून भरणी नक्षत्रात प्रवेश करत आहे.
या नक्षत्रात पुढेच सुमारे 246 दिवस राहू विराजमान असेल. भरणी नक्षत्राचे स्वामित्व शुक्राकडे असून त्यांची देवता यम आहे. त्यामुळे हा दुग्धशर्करा योग मानला जातो. याचा देशासह व दुनियेसह राशींवर ही प्रभाव पडणार आह.
मेष : भरणी नक्षत्रात राहूचा प्रवेशामुळे मेष राशींच्या लोकांना करियर आणि आर्थिक स्थितीत फायदा होऊ शकेल. प्रगती करता येईल व उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे मिळतील आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळवण्याचे सुद्धा संकेत आहेत. वृषभ : भरणी नक्षत्रात राहूचा प्रवेश वृषभ राशींच्या लोकांसाठी सुद्धा धन संपत्ती घेऊन येतो आहे. त्यांना अनेक लाभाच्या संधी मिळतील. तुम्ही तुमच्या करियर मध्ये झपाट्याने प्रगती कराल. प्रवासातून सुद्धा तुम्हाला भरपूर पैसे मिळू शकतील.
मिथुन : या राशीच्या लोकांना आगामी काळात सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतील. शेअर बाजारातून सुद्धा आर्थिक लाभ आणि अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत. आरोग्य सामान्य राहील. कर्क : कर्म स्थानी गुरू असल्याने त्याचे पाठबळ मिळू शकेल. कार्यक्षेत्रात कामाचे समाधान घेऊ शकाल. सुखासह आनंद ही द्विगुणित होऊ शकेल मात्र वाहन चालवताना काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला दिला जातो.
सिंह : या राशींच्या लोकांना परदेशातून काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेतात यश प्रगती सुद्धा साध्य करता येईल. कन्या : कन्या राशीसाठी सुद्धा हा भरणी नक्षत्रातला प्रवेश संमिश्र स्वरूपाचा ठरणार आहे. हितशत्रु पासून सावध राहावं लागेल. तसेच कठोर निर्णय घेणे टाकावं लागेल. एखादा महत्वाचा निर्णय घेताना तज्ञ मंडळींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल बाकी स्थिती सामान्य असेल.
तुला : राहूच्या नक्षत्र बदलामुळे तुला राशींच्या लोकांना पैशाच्या बाबतीत खूप फायदा होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील जीवनात सुख सुविधा वाढतील. तुम्ही कोणत्या तरी ट्रिप ला सुद्धा जावू शकता आनंदाचा काळ जाईल. वृश्चिक : या राशींच्या लोकांना काही समस्यांना सामोरे जावं लागणार आहे. दांपत्य जीवनात सुद्धा काही काळासाठी तणाव निर्माण होऊ शकतो. समाजातील प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी घ्या.
धनु : भरणी नक्षत्रात राहूचा प्रवेश धनु राशींच्या लोकांना लाभदायक असेल. अचानक धनलाभाचे योग जुळून येतील. नौकरदार व्यवसायिक मंडळींना लाभाच्या उत्तम संधी प्राप्त होतील. तसेच मीडिया किंवा एनजीओ संस्थेकडून ही लाभ होऊ शकेल. मकर : भरणी नक्षत्रात राहूचा होणार प्रवेश मकर राशींच्या लोकांना सुद्धा फायदेमंद ठरेल. त्यांच्या चौथ्या भावात असलेला राहू नव्या नौकरी उपलब्ध करून देईल. व्यवसाय आर्थिक लाभ मिळू शकतील. करियर मध्ये मोठे बदल घडून येतील आणि ते तुमच्या फायद्याचे व सकारात्मक असतील.
कुंभ : कुंभ राशींच्या लोकांना सुद्धा हा योग भाग्यकारक ठरू शकेल. तृतीय भागात राहू मेहनतीचे उत्तम फळ प्रदान करेल नशीब चमकेल मात्र नातेवाईकांसोबत नाते संबंध योग्य पद्धतीने हाताळावे लागतील. प्रवास सुद्धा फायदेशीर ठरू शकतील. मीन : भरणी नक्षत्रात राहूचा प्रवेश मीन राशींच्या लोकांना संमिश्र ठरू शकेल. एकीकडे धनभावात राहू असल्याने कार्यक्षेत्रात नविन संधी उपलब्ध होतील. पण दुसरी कडे काही कौटुंबिक कलह होण्याची सुद्धा शक्यता आहे.