वास्तुशास्त्रानुसार या रंगाचे पॉकेट व पर्स तुम्हाला बनवेल श्रीमंत; पैशाची कधीच कमतरता भासणार नाही.!

अध्यात्म

वास्तुशास्त्रानुसार पुरुषांचे पॉकेट आणि महिलांचे पर्स यांचा अगदी जवळचा संबंध आहे, त्याचबरोबर जेव्हा गोष्ट पैशाची येते तेव्हा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंचा सुद्धा प्रभाव आपल्या आर्थिक परिस्थितीशी निगडित असतो. पॉकेट चा यांचा संबंध खूप महत्त्वाचा ठरतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या राशीनुसार आपण कोणत्या रंगाचे पॉकेट व पर्स वापरणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या बद्दल…

मित्रांनो थोडे दिवस या लेखांमध्ये सांगितलेले उपाय नुसार तुम्ही जर पॉकेट व पर्स चा वापर केल्यास तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला सातत्याने वाढ होताना दिसेल परंतु हा प्रत्येकाच्या श्रद्धेचा विषय आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीवर मनापासून श्रद्धा ठेवल्यास त्याचे योग्य फळ आपल्याला मिळतेच.

मेष राशी असणाऱ्या व्यक्तींनी लाल रंगाचे किंवा तपकिरी रंगाचे पॉकेट व पर्स वापरावे आणि पर्समध्ये अनावश्यक वस्तू ठेवू नये.उदाहरणार्थ शॉपिंग बिल ठेवू नये. धनवृद्धी साठी व पैसा येण्यासाठी तुमच्या पॉकेटमध्ये व पर्समध्ये नेहमी दुर्वा ठेवा दुर्वा हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. दूर्वा समप्रमाणात ठेवणे गरजेचे आहे २,४,६,८ या पद्धतीने असे केल्याने तुमच्या पॉकेट मधील पैसा स्थिर राहील व आर्थिक प्रगती होईल. वृषिक राशि असणाऱ्या व्यक्तीने आपल्या पॉकेट चा रंग पांढरा ठेवावा व पर्सचा रंग हिरवा असेल तरी चालेल.

आणि चुकूनही फाटलेलं तुटलेलं पॉकेट पैसे ठेवण्यासाठी वापरू नये सोबतच आपल्या पॉकेटमध्ये व पर्समध्ये अकरा अक्षता चे दाने ठेवावेत. अक्षता म्हणजे अखंड तांदुळाचे दाणे. अक्षता ना वास्तुशास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्रामध्ये शुभ मानले गेलेले आहे.मिथुन राशि असणाऱ्या व्यक्तीने आपल्या जवळ नेहमी हिरवा आणि करड्या रंगाचे पॉकेट व पर्स जवळ ठेवावे आणि वारंवार पॉकेट बदलत राहू नये त्यामुळे धनहानी होते पैसा थांबतो.

हे वाचा:   घरात तिजोरीवर यापैकी 1 वस्तू ठेवा; घरात धनाची समस्या कधीच राहणार नाही.!

त्याचबरोबर आपल्या पॉकेट व पर्समध्ये लाल रंगाच्या चंदनाचा तू छोटासा तुकडा नेहमी सोबत ठेवा असे केल्याने धना मध्ये अचानक वाढ होते.कर्क राशि असणाऱ्या व्यक्तीने आपल्याजवळ क्रीम रंगाचे व पांडुरंगाचे पॉकेट आपल्याजवळ ठेवावे. त्याचबरोबर आपल्या पॉकेट व पर्स मध्ये कोणत्याही प्रकारचे सौंदर्यप्रसाधने म्हणजेच मेकअपचे सामान ठेवू नये, असे केल्याने धन हानी होत असते.

या राशीच्या व्यक्तीने आपल्या पॉकेटमध्ये एक हळकुंड ठेवावे जर हळकुंड शक्‍य नाही झाल्यास चिमूटभर हळद एका कागदामध्ये बांधून आपल्या पॉकेट व पर्स मध्ये ठेवावी जेणेकरून तुमच्या पॉकेटमध्ये नेहमी पैसा कायमस्वरूपी राहील. सिंह राशीच्या व्यक्तींनी आपल्या जवळ लाल रंगाचा किंवा भुरकट रंगाचे पर्स पॉकेट आपल्याजवळ ठेवावे तसेच या व्यक्तींनी फार जुने पॉकेट वापरू नये.

असे केल्याने पैसा टिकत नाही म्हणूनच या राशीच्या व्यक्तींनी आपल्या पॉकेटमध्ये एक लोखंडाची रिंग नेहमी ठेवावी असे केल्याने पैसा स्थिर स्वरूपात सक्रिय राहतो. कन्या राशीच्या व्यक्तींनी आपल्याजवळ विविध रंगांनी भरलेले असे पॉकेट व पर्स वापरावी त्याचबरोबर या राशीच्या व्यक्तीने आपल्या पॉकेट व पर्स मध्ये निळ्या रंगाचा कपडा व रुमाल नेहमी सातत्याने जवळ ठेवावा असे केल्याने धरणांमध्ये अचानक वाढ होते.

तूळ राशीच्या व्यक्तींनी पांढऱ्या रंगाचे पॉकेट व पर्स विकत घ्यावी त्याचबरोबर त्यांनी आपल्या पर्स व पॉकेटमध्ये सोने व पितळ या धातूपासून तयार झालेली कोणतीही वस्तू पॉकेट व पर्स मध्ये ठेवायचे आहे असे केल्याने पैशांमध्ये वाढ होते.धनु राशीच्या व्यक्तीने लाल व चॉकलेटी रंगाचे पर्स पॉकेट वापरावी त्याचबरोबर याची नेहमी काळजी घ्यावी की आपले पॉकेट व पर्स नेहमी पैशांनी भरलेले असावे कधीच ते रिकामे असू नये.

हे वाचा:   रविवारी/अमावस्या दिवशी काळी मिरीचे फक्त 9 दाणे गुपचूप फेका इथे गरिबी निघून जाईल पैशाने घर भरेल

कमीत कमी एक नोट कोणत्याही रुपयांची असू द्या आपल्या पॉकेटमध्ये अवश्य ठेवा. त्याचबरोबर आपल्या पॉकेटमध्ये चांदीचा शिक्का व चाली चांदी पासून बनलेले कोणतेही ही नाणी म्हणजेच गणेशाचे चित्र लक्ष्मीचे फोटो ठेवला तरी चालेल.मकर राशीच्या व्यक्तींनी काळ्या रंगाचे पॉकेट व पर्स नेहमी जवळ ठेवावे. काळा रंग जर अशुभ मानला असेल तरी मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा रंग शुभ मानला गेलेला आहे.

त्याचबरोबर अशा व्यक्तींनी आपल्या पॉकेट व पर्समध्ये नेहमी सुगंधित वस्तू ठेवावी त्यामुळे तुमच्याकडे पैसा हा सातत्याने येत राहील.कुंभ राशीच्या व्यक्तींनी आपल्या नेहमी तपकिरी रंगाचे पॉकेट व पर्स ठेवावे त्याचबरोबर आपल्या पॉकेट व पर्स मध्ये नेहमी सुट्टे पैसे सोबत ठेवावे असे केल्याने पैसा पैसा जवळ आकर्षित होत असतो म्हणून तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये अचानकपणे वाढ होत राहते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.