हिंदू धर्मामध्ये दान धर्माला खूप महत्त्व आहे, असे म्हणतात कि दान-धर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते. दानधर्म करतांना आपण ज्या वस्तू दान करत असतो त्या वस्तूच्या कितीतरी पट आपल्याला पुण्य प्राप्त होत असते परंतु मात्र हे जरी खरे असल्यास तरी काही वस्तू अशा आहेत ज्या दान म्हणून कधीच कुणाला ही देऊ नये.
या वस्तूचे दान कधीही कुणाला करू नये संध्याकाळी तर अगदी करूच नये म्हणूनच सूर्यास्त समय याला आपण संध्याकाळ असे म्हणतो. यावेळी या पाच वस्तू कोणालाही दान करू नये किंवा उधार देऊ नये. बऱ्याचदा आपल्या शेजारी-पाजारी किंवा ओळखीचे लोक सूर्यास्त वेळेला आपल्याकडून या वस्तू उधार मागू शकतात.
परंतु या पाच वस्तू कधीही कोणाला उधार देऊ नये. या पाच वस्तूचे दान केल्याने घरातील बरकत निघून जाते त्याच बरोबर सुख-शांती नांदत नाही.घरामध्ये सारखे सारखे कटकटी, भांडण ,आजारपण येत राहते म्हणूनच चला तर मग जाणून घेऊया या पाच वस्तू नेमक्या कोणत्या आहेत.
लसूण आणि कांदा:- अनेकांना आश्चर्य वाटेल की, लसूण आणि कांदा दान केल्याने नेमका कोणता तोटा होऊ शकतो परंतु जरी तुम्हाला हे खोटे वाटत असले तरी ते सत्य आहे. लसूण आणि कांदा यांचा थेट संबंध केतु ग्रहाशी आहे आणि केतू ग्रह हा असा एक ग्रह आहे, ज्याचा संबंध जादूटोण्याचे आहे. आपल्या आसपास असे अनेक लोक आहेत जे कांदा आणि लसूण यांचा वापर करून आपल्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करू शकतात.
हळद:- हळदीचा थेट संबंध गुरु ग्रहाशी असतो, ज्या व्यक्तींच्या कुंडली मधील गुरु ग्रह शक्तिशाली व बलवान असतो अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये अपार धनसंपदा येते. त्यांच्या आयुष्यात खूप सार्या शुभदायक गोष्टी घडत असतात आणि अशावेळी हळदीचा संबंध थेट गुरु ग्रहाशी आहे म्हणूनच जर आपण संध्याकाळी हळद कोणाला उधार दिल्यास आपला गुरू ग्रह कमजोर पडतो आणि आपल्याला विपरित परिणाम सुद्धा भोगावे लागतील.
पैसा /धन:- अशा वस्तू ज्या मौल्यवान आहेत, म्हणजे पैसा, धन, दागिने इत्यादी वस्तू संध्याकाळी उधार देऊ नयेत. लक्षात घ्या अनेक लोकांना याचा अनुभव आलेला आहे म्हणून लोक संध्याकाळी आपला मुख्य दरवाजा उघडा ठेवतात कारण संध्याकाळ ची वेळ हि माता महालक्ष्मीची घरात येण्याची वेळ असते. यावेळी जर आपण घरातील वस्तू संध्याकाळी पैसे सोने दागिने दुसऱ्याला उधार दिल्यास लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावरील नाहीशी होते आणि तुम्हाला भविष्यात आर्थिक समस्येला सामोरे जावे लागेल.
दही:- दही चा संबंध शुक्र ग्रहाशी असतो. दही आपल्याला सुख व वैभव प्रदान करते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तसा उल्लेख आहे आणि म्हणूनच सूर्यास्त समयी चुकून सुद्धा दही कोणाला दान किंवा उधार देऊ नये. जी व्यक्ति सूर्यास्त समयी दहीचे दान करते अशा व्यक्तीच्या जीवनातून सुख व वैभव नष्ट होते.
दूध:- अनेकांना जाणून आश्चर्य वाटेल की, दूध हे बरे कसे अशुभ असेल परंतु दुधाचा थेट संबंध सूर्यग्रह आणि चंद्रग्रह शी असतो. भगवान श्रीविष्णु आणि माता महालक्ष्मी यांचा सुद्धा संबंध थेट दुधाशी जोडला जातो म्हणूनच सूर्यास्त समयी चुकून सुद्धा दुधाचे दान करू नये.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.