रोग प्रतिकारक क्षमता दुप्पट करण्यासाठी चहामध्ये फक्त मिसळा हे चार घटक.!

आरोग्य

आयुर्वेदिक शास्त्राला भारतामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या आसपास अनेक अशा काही आयुर्वेदिक वनस्पती आहेत, ज्यांचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो आणि आपले आरोग्य रक्षण करू शकतो. आम्ही तुमच्यासाठी या लेखांमध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी घेऊन आलो आहोत,ही अशी वनस्पती आहे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता अधिक पटीने वाढेल आणि तुम्ही भविष्यात कधीच आजारी पडणार नाही.

अनेकदा वातावरणामध्ये थोडेतरी बदल झाले तरी आपल्याला सर्दी खोकला सुरू होतो आणि आपण कोणताही विचार न करता डॉक्टरांकडे पळतो. हे सगळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता नाजूक असल्यामुळे घडत असते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचा उपाय सांगणार आहोत. हा उपाय तुम्ही केल्याने तुमची क्षमता वाढेल, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..

या वनस्पतीचे नाव आहे , गवती चहा. ही वनस्पती आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असते. या वनस्पतींमध्ये अनेक औषधी गुणधर्म या वनस्पतीच्या सहाय्याने सर्दी खोकला यासारख्या समस्या क्षणात दूर करू शकतो. त्यासाठी तुम्हाला ही वनस्पती चहामध्ये मिसळायचे आहे. गवती चहा प्यायल्याने तुम्हाला शरीरामध्ये तरतरी आल्याची जाणवेल.

हे वाचा:   चेहऱ्याला फक्त 1 वेळ लावा..चेहरा गोरा व उजळ बनेल..पिंपल्स गायब, काळे डाग नाहीसे..चेहरा इतका सुंदर होईल की..

गवती चहा मध्ये सुंठ, मिरी मिसळल्यास तुम्हाला सर्दी खोकला ताप अशक्तपणा जाणवणार नाही.जर तुम्हाला ताप आल्यावर तुम्ही गवती चहाचा वाफ घेतल्यावर तुम्हाला त्वरित घाम येईल आणि ताप क्षणांमध्ये उतरून जाईल.गवती चहाचा काढा बनवण्यासाठी तुम्ही मिरी म्हणजेच काळी मिरीचे दाण्यांचा उपयोग करू शकता. काळीमिरी मुळे खोकला, घसा खखवणे सारख्या समस्या लवकर दूर होतात.

काळी मिरी हा मसाल्यातील मुख्य पदार्थ आहे त्याचबरोबर काळीमिरी मध्ये अपचन दूर करणे सारख्या समस्या नष्ट करण्याची शक्ती असते म्हणून तुम्ही गवती चहाचा काढा बनवण्यासाठी काळीमिरी चा सुद्धा उपयोग करू शकतात. त्याचबरोबर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिसरा घटक वापरायचा आहे तो म्हणजे लवंग. लवंगाचे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनेक महत्त्वाचे उपयोग सांगण्यात आलेले आहे. हा उष्ण पदार्थ आहे. या पदार्थामुळे शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता अधिक वाढते आणि आपल्या शरीराला संरक्षण कवच सुद्धा लाभते.

अंगामध्ये कणकण, तोंडाची दुर्गंधी, पचनसंस्था कार्य नीट करण्याची शक्ती असते त्याचबरोबर लवगांमध्ये गॅस्ट्रिक ऍसिड असते, या गॅस्ट्रिक ऍसिडमुळे आपल्या शरीरातील जी काही टॉक्सिक म्हणजेच विषारी घटक असतात ते शरीरा बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. अपचना मुळे होणारी जळजळ सारखी समस्या क्षणांमध्ये दूर होईल.

हे वाचा:   सर्दी, खोकला, कफ जमा होणे, घसा दुखणे...याच्या एकदा सेवनाने छुमंतर गायब होईल..प्रभावी आणि सोपा असा घरगुती उपाय..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चौथा घटक मिसळायचा आहे तो म्हणजे आले. आले ला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. आले ल्या मध्ये अँटी सेप्टिक असे गुणधर्म असतात त्यामुळे सर्दी, खोकला, घसा खवखव करणे, पोटाच्या समस्या वर रामबाण उपाय म्हणून आल्याचा वापर केला जातो. हे चारही घटक मिसळून जर तुम्ही चहा केला तर तुम्ही तुम्हाला चांगले आरोग्य प्राप्त होईल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.