घराच्या मुख्य प्रवेश द्वारावर लावा या वस्तू; माता महालक्ष्मी चा होईल कृपेचा वर्षाव.!

अध्यात्म

जेव्हा आपले घर घेतो तेव्हा घराच्या आतील गोष्टींचा विचार करत असतो त्याचबरोबर आपल्या घराचे प्रवेशद्वार कसे सुंदर व आकर्षक दिसेल याचा सुद्धा विचार करतो कारण असे म्हणतात की अंगनावरूनच घराची परीक्षा होते.सुख-समृद्धी आरोग्य घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अनेक अशा काही गोष्टी प्रवेश द्वारा बद्दल जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

सकाळी झोपेतून उठल्यावर आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार लगेच उघडावे.जेव्हा आपण भगवंतांची पूजा अर्चना करत असतो अशा वेळेस सुद्धा घरातील प्रवेशद्वार नेहमी उघडे ठेवावे.सकाळी उठल्यावर जेव्हा आपण प्रवेशद्वार उघडू तेव्हा उंबरठ्यावर एक तांब्या पाणी शिंपडावे. असे केल्याने रात्रभर मध्ये उंबरठ्यावर जमा झालेली नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही.

त्याचबरोबर रात्री तुम्ही उंबरठा जवळ एक तांब्या भरून त्यामध्ये गोमूत्र, गुलाबजल टाकून ठेवू शकता असे केल्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.घराच्या प्रवेश द्वारा च्या आत माता महालक्ष्मी चे फोटो जरूर लावावा तसेच घराच्या बाहेर पडताना माता महालक्ष्मी चे दर्शन जरूर घ्यावे.

हे वाचा:   हातात कडे घालण्याचे हे फायदे ऐकून थक्क व्हाल...आपल्या शरीरात काय काय घडते पहा..हे माहिती असले पाहिजे

घराच्या दरवाज्याची बेल उजव्या बाजूला असावी जेणेकरून तुम्ही उजव्या हाताने घराची बेल वाजवून शकतात त्याचबरोबर घराच्या उंबरठ्यावर नेहमी हळद-कुंकू सहाय्याने स्वास्तिक व ओम जरूर काढा.रांगोळी का ढा असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते व माता महालक्ष्मी प्रसन्न राहते.

घराच्या प्रवेशद्वाराला नेहमी आंब्याचे तोरण लावा. हे तोरण लावल्याने माता महालक्ष्मी प्रसन्न राहते.घराच्या प्रवेशद्वाराजवळ तुळशी नेहमी लावा. तुळशी मध्ये नकारात्मक ऊर्जा सकारात्मक मध्ये रुपांतर करण्याचे सामर्थ्य असते त्याचबरोबर तुळशी भगवान विष्णू देवाचे प्रिय मानलेले असते आणि विष्णू माता महालक्ष्मी यांचा संबंध सुद्धा जवळचा आहे म्हणूनच जेव्हा आपण माता महालक्ष्मीची आराधना करतो अशावेळी जर आपण भगवान विष्णूची आराधना केल्यास माता महालक्ष्मी लवकर प्रसन्न होते.

हे वाचा:   विवाहित स्त्रीयांनी बांगड्या घालतांना या गोष्टी विशेष पाळाव्यात; नाहीतर होईल खूप पच्छाताप.!

घरातील वास्तुदोष तसेच वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर श्री गणेश व हनुमान यांचा फोटो जरूर लावावा. त्याचबरोबर तुरटीचा खडा लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून प्रवेशद्वाराजवळ लावू शकता असे केल्याने नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करणार नाही व घरातील सदस्यांना चांगले आरोग्य व मानसिक आरोग्य लाभेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.