चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने मुळासकट दूर होतात हे ७ रोग.!

आरोग्य

मित्रांनो तुमच्या आमच्या एक परिचयाचं झाड ते म्हणजे चिंचेचं झाड. तुम्हाला आठवतंय का कि लहानपणी चिंचेची कोवळी पण आपण चावून खायचो. थोडीशी आंबट आणि थोडीशी तुरट असणारी हि पाने खरंतर किती फायदेशीर आहेत हे आपल्याला बालपणी ठाऊक नव्हतं. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कि चिंचेची कोवळी पाने खाल्ल्याने शरीराला कोणकोणते फायदे होतात.

तुम्हाला आच्छर्य वाटेल मात्र या चिंचेमध्ये अनेक पौष्टिक घटक आहेत जे आपलं आरोग्य चांगल ठेवतात. आजकाल मॉडर्न दुनियेमध्ये चिंचेची पाने तोडून खाणे तितकेसे चांगले मानले जात नाही. लोक म्हणतात कि प्रदूषण वाढलेलं आहे त्या पानांवरती धूळ असते, हि खरी गोष्ट आहे. जर तुमच्या भागामध्ये प्रदूषण असेल तर थोड्या मिठाच्या पाण्यामध्ये हि पाने थोडी धुवून घ्या मग ती पाने तुम्ही खा.

साधारणतः एप्रिल, मे, जून या ३ महिन्यांमध्ये तुम्हाला चिंचेची कोवळी पाने पाहायला व खायला मिळतील. तर चला जाणून घेऊया या चिंचेच्या पानांचे नेमके कोणकोणते फायदे आहेत.

हे वाचा:   5 रुपयांची ही वस्तू 1 वेळा केसांना लावा केस गळती होईल बंद; केस काळे, लांब,घनदाट करणारा उपाय.!

मित्रांनो चिंचेची कोवळी पाने अशीही खाल्ली जातात आणि त्याची भाजी सुद्धा करता येते. आपल्या लहानपणी आपली आजी, आपली आई आपल्यासाठी या पानांची भाजी करून द्यायची. मित्रांनो या पानांमध्ये लोह भरपूर आहे, मित्रांनो तुम्ही जर हि चिंचेची पाने खाऊ लागलात किंवा या कोवळ्या पानांची भाजी केलीत तर त्यामधून आपल्याला लोहाचा पुरवठा भरपूर प्रमाणात होतो. यामुळे ऍनिमिया होण्याचा संबंध सुद्धा होणार नाही.

मित्रांनो हि पाने लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत अगदी कोणीही खाऊ शकत. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसेच आपली हाडे , आपले दात मजबूत ठेवण्यासाठी फॉस्परस च फार मोठं योगदान आहे. आणि हे फॉस्परस नावाचं खनिज आहे ते या पानांमध्ये मुबलक आहे. आणि म्हणून आपली हाडे मजबूत करण्यासाठी किंवा सांधेदुखी सारखा त्रास कमी करण्यासाठी आपण या पानांचं सेवन नक्की करावं.

मित्रांनो चिंचेच्या पानांमध्ये क्लोरीन, तांबे, गंधक हे घटक असतात. हि सर्व खनिजे आपल्या शरीराच्या संपूर्ण कार्यक्षमता वाढवणारी आहेत. आपले आरोग्य सुधारणारे हे फायदे आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गचकरणाचा त्रास वाढतो त्यावेळी जर हि तुम्ही पाने खाल्लीत तर गचकरणापासून आपला मोठा बचाव होतो. तसेच ज्यांना रक्ताचे विकार आहेत हि पाने खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यास देखील मदत होते.

हे वाचा:   दबलेल्या 72 हजार नसा होतील पूर्णपणे मोकळ्या; यासाठी करा हा रामबाण घरगुती उपाय.!

आजकाल ट्युमरच प्रमाण खूप वाढत चाललंय, तर मित्रांनो ट्युमर पासून सुद्धा बचाव करणारी अशी हि चिंचेची पाने आहेत. मग मित्रांनो इतके सगळे फायदे जर या वनस्पतीचे असतील तर चिंचेची कोवळी पाने खाण्यास काय हरकत आहे..?

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.