दिवसातून फक्त २ वेळा प्या…आणि बघा सतत होणारी सर्दी, जुनाट दमा (अस्थमा) श्वास फुलणे; कायमसाठी ठीक होऊन जाईल…

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, दमा एक किचकट आणि जटील व्याधी आहे. सामान्यत: अनुवंशिक आणि वातावरणात ल्या ऍलर्जीमुळे जास्तकरून दमा होत असतो. दम्यावर उपचार करूनही तो पुन्हा पुन्हा उद्भवत असतो व अत्यंत त्रासदायक ठरतो.

श्वास फुलणे, थोडे चालल्यावर थकणे किंवा घुसमट होणे हे दम्याची किंवा अस्थम्याची लक्षणे आहेत. यापासून सुटका मिळविण्यासाठी तुमच्याबरोबर आम्ही आज जो घरगुती उपाय शेअर करणार आहे तो अतिशय रामबाण असा उपाय आहे.

एकदम कमी सामान घेऊन आपण हा उपाय करणार आहोत. तो केल्यावर तुम्ही या सगळ्या समस्यांपासून सुटका करून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया. साहित्य- ५ लवंगा, ५ ते ७ काळी मिरी, छोटासा आल्याचा तुकडा, १ ग्लास पाणी, ५ तुळशीची पाने, मध १. १/२ चमचा.

हे वाचा:   हे 4 दाणे चावून खा आणि कमाल पहा; जळजळ होणे, पित्त यासारखे आजार होतील पूर्णपणे नाहीसे.!

लवंग- अस्थमा किंवा दमा असलेल्या रुग्णांसाठी खूपच फायदेशीर आहे. याच्या सेवनाने शरीरात उष्णता कायम राहाते. लवंग फूल असलेली पाहिजे. आता आपण हा काढा कसा करायचा ते पाहूया. गॅसवर चहा ज्यामध्ये करतो ते भांडे ठेवा व त्यामध्ये १ मोठा ग्लास भरून पाणी ठेवा. पाणी उकळायला लागले की त्यामध्ये लवंग टाका.

नंतर त्यामध्ये ७ काळ्या मिरी टाका. आले धुवून किसून घ्या. आता किसलेले आले पाण्यात टाका. आता तुळशीची (कोणतीही तुळस चालेल- रामा किंवा शामा) ५ पाने स्वछ धुवून त्या उकळत्या पाण्यात टाका. आता हे पाणी जवळजवळ पाऊण ग्लास होईपर्यंत उकळवायचे आहे म्हणजे सगळ्या पदार्थांची सत्वे व गुणधर्म पाण्यामध्ये उतरतील.

(साधारण ७ ते ८ मिनिटे लागतील) गॅस बंद करा. आता हे ग्लास मध्ये गाळून घ्या. आता अजून काही वस्तु आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत. ज्यामुळे ज्यांना अस्थम्याचा त्रास आहे त्यांना याचा फायदा होईल. आता पाणी थोडे कोमट झाले की आपण त्यात दीड चमचा मध घालणार आहोत.

हे वाचा:   कॅन्सर होण्याच्या सुरुवातीस आपले शरीर देते हे संकेत.. वेळीच जाणून घ्या.. यामुळे आपला जीव वाचू शकतो

आता आपला काढा तयार झाला आहे. आता याचा वापर कसा करायचा ते पाहूया. हा काढा आपल्याला एकदम प्यायचा नाही. दिवसातून २ ते ३ वेळा हा चहा किंवा काढा प्यायचा आहे. सकाळी संध्याकाळी घेऊ शकता पण थोडा गरम करून प्यायचा आहे. तसेच दम्याच्या रुग्णांनी मधाचा वास घ्यायचा आहे. तुम्हाला यापासून खूपच आराम पडेल.

मित्रांनो आमचा लेख तुम्हाला कसा वाटला ते जरुर कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि हा लेख भरपूर प्रमाणावर शेअर करा धन्यवाद..