जपानी लोक इतके दीर्घायुषी कसे जगतात..यामागील रहस्य जाणून आश्चर्य वाटेल…तुम्ही देखील या गोष्टी करून १०० वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकता..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपले आयुष्य सुंदर असावे, त’णावरहित, सर्व सोयींनी युक्त असावे असे प्रत्येकालाच वाटत असते. त्या दृष्टीने प्रत्येक जण प्रयत्न हि करत असतो पण बऱ्याचदा त्याचे प्रयत्न अपुरे पडतात किंवा ते चुकीच्या दिशेने होतात व आपल्या आयुष्यात अडचणी निर्माण होतात.

कधी कधी काही गोष्टी आपणाला दुसऱ्यांच्या ऐकून, पाहूनही करणे फायद्याचे ठरते. मग ते आपल्या जवळचे लोक असोत वा एखाद्या दुसऱ्या देशातले. असाच एक प्रयोग आपण जपान देशातील एका पद्धतीचा वापर करून करून पाहू शकतो. ‘ईचीगो इचीये’ याचाच अर्थ आताच, या क्षणाला. ईचीगो इच्छिते या पुस्तकातून त्यांनी सुखी राहण्याची दहा जपानी तंत्रे सांगितली आहेत आपण त्याचा अभ्यास करू या.

१. एखादी गोष्ट करायची असेल तर लगेचच करावी अभी नही तो कभी नही हा नियम नेहमी पाळला जावा हे आहे पहिले तंत्र. २. प्रत्येक गोष्ट ही आयुष्यात एकदाच घडणार आहे. आयुष्यातला कुठलाही क्षण कुठलीही घटना ही कधीच पुन्हा घडत नसते म्हणून प्रत्येक क्षण प्रत्येक घटनेची कदर करा.

हे वाचा:   कैरी खाण्याचे हे अद्भुत फायदे तुम्ही ऐकलेत का.? ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

३. नेहमी वर्तमानात जगा आपल्या भूतकाळातील चुकान पासून नक्कीच बोध घ्यावा पण भूतकाळात अडकून राहू नये. सतत आपण वर्तमानात राहायला शिकले पाहिजे. ४. काहीतरी नवीन करा सतत तेच केले तर नवीन काही अनुभव, नवीन काही उत्पन्न होण्याची शक्यता नसते म्हणून ठराविक कालानंतर नवीन गोष्टी करायला शिकले पाहिजे.

५. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून शांत बसून ध्यानधारणा केली पाहिजे. ६. पंचेंद्रियांच्या पूर्ण वापर. आपले डोळे कान नाक जीभ त्वचा या यांचा पूर्ण वापर करून आनंद मिळवा जसे पिवळाधमक हापूस चा सुवासिक आंबा खाऊन आनंद मिळवता येतो.

७. योगायोगाकडे दुर्लक्ष करू नका. जर सातत्याने एखादी घटना घडत असेल तर ती निव्वळ योगायोग नसून निसर्गाचा परिस्थितीचा काही तरी संकेत असतो हे लक्षात घ्या. ८. प्रत्येक क्षण जगा. प्रत्येक क्षण साजरा करण्यासाठी औचीत्याची वाट पाहू नका. तो समारंभ आहे असे समजून छानपैकी जगून घ्या.

हे वाचा:   वाढलेला नंबर खात्रीशीर होईल कमी; सतत होणारी सर्दी कायमची बंद ,हि फुलं नसून चमत्कार आहे.!

९. बदल घडवा. एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती बदलण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा आपणास हवी तशी परिस्थिती तयार करा. १०. सराव करा. कोणतीही गोष्ट ही सरावाने जमत असते. आपल्याला जे साध्य करायचं आहे त्यासाठी सतत ती गोष्ट करत राहिले पाहिजे. सतत ती गोष्ट पहिल्या पेक्षा चांगली करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

मित्रांनो ही आहेत ती दहा जपानी तंत्रे. यांचा वापर करून आपले आयुष्य जास्तीत जास्त सुखी करण्याचा अवश्य प्रयत्न करा.