कोणताही वि’षारी विंचू चावला तर करा सर्वात अगोदर करा हा घरगुती उपाय एक मिनिटात वीष उतरेल घरगुती उपाय..

आरोग्य

आपल्या आजूबाजूला घराच्या जवळ शेतामध्ये, गोठ्यामध्ये बरेचसे कीटक प्राणी असतात किती भयंकर प्रकारचे विषारी असतात. यामध्ये विषारी प्राण्यांमध्ये साप, विंचू असे प्राणी तुम्ही पाहिले असते. यामध्ये आज आपण पाहणार आहोत विंचू विषयी.

मित्रांनो अंधाऱ्या दमट जागी गोठ्याजवळ विंचू असू शकतो. अशा ठिकाणी वावरताना तसेच बरेच शेतकरी बंधू शेतात काम करताना किंवा बांधकामाच्या ठिकाणी अडगळीच्या ठिकाणी अपघाताने विंचू चाऊ शकतो. काहीवेळा दवाखाने लांब असतात तिथे पोहोचेपर्यंत असे घरगुती उपचार प्रत्येक व्यक्तीला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विंचवाचे विष सापाच्या विषारी असते परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत.

विंचु चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर मळमळ येणे, खूप घाम येणे, पायात पेटके येणे, बेशुध्द होणे अशी लक्षणे दिसून येतात. जेवढा विंचू लहान तेवढा धोका कमी पण खूपच मोठा विंचू चावल्यास तेवढा जास्त त्रास होतो कोणत्याही विंचवाचा त्रास कमी होण्यासाठी एक मिनिटात आराम मिळवण्यासाठी आज आपण तीन उपाय पाहणार आहोत.

हे वाचा:   कितीही मोठा मुतखडा असुद्या या घरगुती उपायाने केवळ २ दिवसातच बाहेर पडेल.!

आज आपण विंचवाचा त्रास कमी करणारा पहिला उपाय पाहणार आहोत. या पहिला उपायासाठी जी वनस्पती लागणार आहे ती वनस्पती सर्वत्र आढळते. ती वनस्पती आहे उंबर. उंबर वृक्ष सर्वत्र आढळतो. उंबर अत्यंत यावरती प्रभावी ठरतो. याची दोन ते तीन पाने खलबत्त्यात किंवा जे साहित्य उपलब्ध असेल त्या साहित्याच्या सहाय्याने उंबराचे पान चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्या हा लगदा विंचू चावल्यास ठिकाणी लावा आणि वरून एक कपडा बांधा. विंचवाचा त्रास एक मिनिटात लगेच तुम्हाला कमी झालेला पाहायला मिळतो.

यासोबतच मित्रांनो दुसरा उपाय पाहणार आहोत. या उपायासाठी आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध होते ही वनस्पती म्हणजे बोरीचे झाड बोरे आपल्याला माहित आहे. त्या बोरीच्या झाडाचे  पाच ते सात पाने घेतल्यानंतर त्याला चांगल्या प्रकारे बारीक कुटून घ्या बारीक आणि जो लगदा तयार होईल विंचू चावला आहे त्या ठिकाणी लावा आणि त्यावरती कपडा बांधला तर त्यानेही  वेदना कमी होतात. विंचवाचे विष उतरण्यास ही वनस्पती अत्यंत उपयुक्त आहे.

हे वाचा:   1 तुकडा सकाळी किंवा झोपताना खा; सकाळी पोट झटक्यात साफ, शरीरात पोषण तत्वाची कधीच कमी भासणार नाही.!

यानंतर शेवटचा उपाय पाहणार आहोत. यासाठी आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाची वनस्पती आहे या वनस्पतीचे नाव आहे तुळस मित्रांनो तुळस यासाठी अत्यंत गुणकारी आहे. तुळशीचे पाच ते सात पाने घ्या कुस्करून किंवा बारीक वाटून घ्या. मित्रांनो ज्या विंचू चावला आहे. त्या ठिकाणी बांधला आणि वरून पट्टी लावा तुम्हाला एक मिनिटांमध्ये तेथे वेदना कमी झालेल्या दिसतात.

मित्रांनो लक्षात ठेवा हे घरगुती उपाय आहेत प्राथमिक उपचार आहेत. हा उपाय दवाखान्यात जाण्यापूर्वी नक्की करा आणि दवाखान्यात जाऊन तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घ्या. असे हे दवाखान्यात जाण्यापूर्वी घरगुती उपाय केल्याने आराम मिळतो.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉ’क्टर-वैद्याचा सल्ला घ्या.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.