तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करेल हे फुल; अशाप्रकारे करा या फुलाचा उपाय.!

अध्यात्म

स्वतःचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते.आपले संपूर्ण  आयुष्याचत स्वतःच्या मालकीच्या एक तरी घर  आपण बांधावे किंवा ते आपण विकत घ्यावे असे प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. मात्र प्रत्येकाची इच्छा काही पूर्ण होत नाही. नवीन घर बांधण्यासाठी व नवीन घर शोधण्यासाठी ,एखादी जागा विकत घेण्यासाठी काहींचे संपूर्ण आयुष्य निघून जाते पण घर काही पूर्ण होत नाही.

जर तुम्हीसुद्धा एखादा प्लॉट विकत घेत आहात परंतु काहीना काही कारणांमुळे तो बांधला जात नाही आहे किंवा तुमचे सुद्धा स्वप्न नवीन घर बांधण्याचे आहे तसेच घर विकत घेतलेले आहे पण घर बांधण्यासाठी मुहूर्त मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टीं साठी काहीना काही अडथळे निर्माण होत आहेत परंतु या अडथळ्यांवर सुद्धा काही छोटे-मोठे उपाय आहेत.

जर ते उपाय व्यवस्थित रित्या केल्यास तुम्हाला लवकरच समस्याचे समाधान मिळू शकणार आहे म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये अशीच काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल…

नवीन घरासाठी नियमितपणे श्री गणेशाय नमः जय गणेशाय नमः या मंत्राचा जप करणे गरजेचे आहे.  ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसातून कमीत कमी १०८ वेळा या मंत्राचा उच्चार करायचा आहे आणि या मंत्राचा जप करताना चुकूनही तुळशीच्या माळेचे चा वापर करू नका. जर तुमच्याकडे वेळ नसेल तरी तुम्ही या मंत्राचा उच्चार चालता-बोलता कुठेही कधीही केव्हाही करू शकता. या मंत्राचा प्रभाव एवढा भारी आहे की,तुम्हाला दीड-दोन महिन्यातच चमत्कारी फायदा जाणवू लागेल आणि तुमच्या वास्तूचे रखडलेले काम सुरू होण्यास योग्य तो मुहूर्त मिळेल.

हे वाचा:   पाल देते मृत्यूचे संकेत...पाल याठिकाणी पडली तर घरातील सर्व व्यक्तींचा मृ त्यू होऊ शकतो व घर नाश पावतो

२१ संकष्टी चतुर्थी चा उपवास करावा. ज्या लोकांना २१  संकष्टी चतुर्थीचा उपवास करणे शक्य नाही अशांनी एकवीस मंगळवारचा एक भोग  उपवास करावा. हा सगळा उपवास तुम्हाला श्री गणपतीच्या नावाने करायचा आहे. हा उपवास करत असताना प्रत्येक मंगळवारी गणपतीबाप्पांना एक जास्वंदाचे फुल वाहायचे आहे.

परंतु हे फूल वाहताना पहिला मंगळवारी एक फुल दुसऱ्या मंगळवारी २ फुल अशा प्रमाणे २१ व्या मंगळवारी २१ जास्वंदाचे फुल गणपती बाप्पा वाहायचे आहेत तसेच प्रत्येक मंगळवारी हे जास्वंदाचे फुल आपण वाहणार आहोत त्याच बरोबर २१ दुर्वा सुद्धा गणपतीला वाहायचे आहेत.

आपले स्वतःचे घर होत नाही म्हणून अनेक वेळा आपण चिंता करू लागतो अनेक जण तणावाखाली जातात. अनेकांना काही आजार सुद्धा निर्माण होत असतात. किती दिवस भाड्याच्या घरामध्ये राहायचे असे अनेक नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येत असतात परंतु हे सगळे विचार करण्याऐवजी जर तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचे पठण केल्यास काही दिवसांमध्येच तुमच्या सगळ्या चिंता दूर होतील आणि लवकरच तुमचे स्वतःचे घर होण्यास मदत होईल व तुमचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. 

हे वाचा:   14 मे अक्षय तृतीया: गुपचूप जप करा हा एक मंत्र, पैशांचा ढीग लागेल..साक्षात लक्ष्मी घरात प्रवेश करेल

जर तुम्ही तुमच्या स्वप्नातली घरासाठी एखादी जागा पाहिली आहे किंवा एखादे घर बुक केलेले आहे परंतु त्याकरिता आवश्यक असणारे बँकेचे लोन मंजूर होत नाही आहे किंवा लोन साठी काही समस्या निर्माण होत असल्यास त्यासाठी सुद्धा एक छोटासा पण प्रभावी उपाय आहे. तो उपाय म्हणजे आपल्याला प्रत्येक मंगळवारी एक वाटी मसूर डाळ घ्यायची आहे त्यामध्ये १००ते २०० ग्रॅम गूळ मसूर डाळी मध्ये टाकायचा आहे.

हे मिश्रण लाल रंगाच्या गोमातेला खाऊ घालायचे आहे तसेच गोमातेच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवा. तिच्यासमोर नतमस्तक व्हा. तुमच्या मनातील संकल्प गो मातेसमोर मांडा. प्रत्येक मंगळवारी जर तुम्ही वरील उपाय केल्यास तुम्हाला लवकरच होम लोन संदर्भातील जे काही अडथळे आहेत ते दूर होतील आणि कार्यामध्ये सुलभता प्राप्त होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.