बदललेली जीवनशैली आणि राहणी मान यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे हवे तेवढे लक्ष देत नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. अनेकदा बाहेर तेलकट,तिखट पदार्थ खाणे या मुळे पोटाच्या समस्या सुद्धा निर्माण होत असतात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात.विशेष करून तरुण मुलांना हि समस्या खुप जाणवते.
म्हणून आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. एक उपाय करा आणि पिंपल्स लगेच दूर करा आज पिंपल्स बरे होण्यासाठी खूपच सुंदर उपाय घेऊन आलो आहे. या उपायाने तुमचे पिंपल्स पूर्णपणे बरे होण्यास मदत करतील. सर्वात आधी पिंपल्स येण्याचे कारण बघणार आहोत.
जर आपण बाहेर गेलो त्यानंतर घरी आल्यावर चेहरा लगेच स्वच्छ धुतला नाही तर त्यावर धूळ साचली जाते आणि ती साचलेली धूळ चेहऱ्यावर असलेला छोट्या-छोट्या रोमचे चेहऱ्यावर जाऊन बसते आणि कालांतराने ते पॅक होऊन जातात आणि नंतर काही दिवसाने याचे रूपांतर पिंपल्स मध्ये हळूहळू होत जाते यामुळे आपल्याला पिंपल्स येणे सुरुवात होते.
म्हणून कधीही बाहेरून आल्यावर सर्वात प्रथम चेहरा स्वच्छ धुवा आणि नॅपकिन ने चेहरा थोडासा दाबून स्वच्छ पुसून घ्या, असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचे पिंपल्स येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची ऍलर्जी असेल ती देखील तुम्हाला होणार नाही. फक्त ७० ते ८० टक्के तुमचे पिंपल्स येण्याचे प्रमाण कमी होऊन जाईल.
हे झाले नॉर्मल कारण आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता जास्त असल्यास त्याचे रूपांतर आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ शकतात.हा उपाय करण्यासाठी काही सामग्री लागणार आहे. इथे आपल्याला लागणार आहे साबुदाणे आणि साबुदाण्याचे पीठ करून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे हळद व गुलाब पाणी याचा वापर कसा करायचा ते आपण जाणून घेणार आहोत.
त्याच प्रमाणे एक बाऊल घेऊन त्या बाऊलमध्ये एक चमचा साबुदाण्याचे पीठ घ्यायचे आहे व थोडीशी हळद घ्यायची आहे आणि मिश्रण मिक्स होईल इतके गुलाबजल घ्यायचे आहे. हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला पिंपल्स आहे त्या ठिकाणाची स्कीन आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे त्यानंतर हा लेप त्यावर लावून तो सुकेपर्यंत राहू द्यायचा आहे.
नंतर त्वचा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे, असे किमान आठवड्यातून तीन वेळेस तरी करत चला हा उपाय केल्यामुळे तुमचे पिंपल्स पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे तुमच्या पिंपल्सचे डाग पूर्णपणे निघून जातील आणि पिंपल्स वर हा लेप लावून फक्त मालिश करू नका. कुठल्याही प्रकारची क्रीम आणि कुठल्याही प्रकारचे प्रॉडक्ट वापरले तर पिंपल्स जास्त पसरले जातात. फक्त हा लेप लावून तुम्ही स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.