केस गळत असतील तर हे ७ उपाय एकदा नक्कीच करा; एका रात्रीतच होईल केस गळणे पूर्णपणे बंद.!

आरोग्य

सध्याच्या काळामध्ये प्रत्येक जण व्यस्त ,धावपळीत असतो.त्यामुळे स्वतः कडे विशेष लक्ष देण्याकरिता लोकांना वेळ नसतो म्हणूनच अनेक समस्या निर्माण होत असतात,त्याचबरोबर कामाचा वाढलेला ताण यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतात. आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये महत्त्वाची माहिती माहिती सांगणार आहोत.

आज आम्ही तुमच्यासाठी केस गळत असतील किंवा केस विरळ होऊन टक्कल पडत असतील हे सगळे रोखण्यासाठी आज आम्ही काही महत्त्वाचे उपचार सांगणार आहोत. हे उ पचार तुम्ही केल्यानंतर तुम्हाला लवकरच फरक पडेल. सांगितलेले उपाय जर तुम्ही केल्यास हळूहळू तुमच्या पडलेल्या टक्कलवर केस येऊ लागतील आणि सांगितलेले उपाय हे पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे तुमच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही.

मेथीचे दाणे:- यासाठी तुम्हाला मेथीच्या दाण्याची पेस्ट करायची आहे. व मेथीचे दाणे दह्यामध्ये मिक्‍स करून घ्यायचे आहे. आपल्या केसांच्या लांबीनुसार ही पेस्ट आपल्याला तयार करायची आहे. ही पेस्ट केसांच्या मुळापासून ते शेवटपर्यंत लावायचे आहे आणि दोन ते अडीच तास ही पेस्ट केसांवर राहू द्यायचे आहे त्यानंतर के स्वच्छ पाण्याने धुवा,असे केल्याने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल त्याचबरोबर केसांची वाढ सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल.

उडदाची बिन सालीची डाळ:- उडदाची बिन सालीची डाळ म्हणजे पांढरी उडदाची डाळ.आपल्याला उकळून त्याची पेस्ट करायची आहे. शिजवलेल्या डाळीची पेस्ट तुम्हाला ज्या ठिकाणी टक्कल पडले आहे त्या ठिकाणी लावायची आहे. हे तुम्हाला दररोज करायचे आहे, असे केल्याने केस भरून येण्यास सुरुवात होते परंतु एक लक्षात असू द्या की जेव्हा तुम्ही टकल्यावर ही पेस्ट लावाल तेव्हा नवीन शिजवलेल्या डाळीचे पेस्ट तयार करा. याकरिता आधी पेस्ट बनवून ठेवू नये अन्यथा हवा तेवढा फरक पडणार नाही.

हे वाचा:   जेवणानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर व्हाल गं’भी’र आजारांचे शि’का’र.!

ज्येष्ठमध पावडर:- ज्येष्ठमध पावडर दूध किंवा पाण्यामध्ये मिसळून घ्यायची आहे आणि दहा ते पंधरा मिनिटं हे मिश्रण असेच ठेवायचे आहे नंतर हे मिश्रण ज्या ठिकाणी तुमचे टक्कल पडलेले आहे त्याठिकाणी लावायचे आहे. असे केल्याने टक्कल हळूहळू कमी होईल व केस उगवू लागतील.

ताजी कोथिंबीर:- ताजी कोथिंबीर घेऊन ती स्वच्छ निवडून घ्या आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट टक्कल असलेल्या ठिकाणी लावा तसेच केसांना लावल्यामुळे तुमचे केस कोमल आणि रेशमी राहतील त्याचबरोबर टक्कल पडलेल्या ठिकाणी वर केस उगवून लागतील.

पांढरा कांदा:- एक पांढरा कांदा घेऊन त्याची पेस्ट तयार करा, यामध्येच दहा ते बारा गावठी लसणाच्या पाकळ्या टाका आणि जर शक्य झाल्यास जास्वंदीचे फूल टाका किंवा लाल जास्वंदी फुलाच्या झाडाचे पान सुद्धा चालेल. मग या मिश्रणाची पेस्ट तयार करा त्यानंतर या पेस्टमध्ये एक वाटी भरून खोबरेल तेल व अर्धी वाटी एरंडेल तेल टाका नंतर हे मिश्रण मंद आचेवर उकळुन घ्या.

जोपर्यंत चांगल्या पद्धतीने अर्क निघत नाही तोपर्यंत उकळून घ्या.मंग थंड झाल्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही केसांवर तेलाचा वापर कराल तेव्हा याच तेलाचा वापर करायचा आहे. असे केल्याने तुमची केस गळती पूर्णपणे बंद होईल आणि केसांची वाढ सुद्धा चांगली राहील.

हे वाचा:   फणसाच्या बीयांचा असा वापर पाहून तुम्हीसुद्धा दंग व्हाल; खूपच फायदेशीर आहेत या बिया.!

पिकलेली केळी:- एक पिकलेली केळी घ्या आणि त्यामध्ये लिंबूचा रस मिसळून पेस्ट तयार करा व ही तयार झालेली पेस्ट तुम्ही टक्कलवर लावल्यास केस येऊ लागतील त्याचबरोबर केसांमधील कोंडा केसांमधील उवा कमी होऊ लागतात आणि नैसर्गिक रित्या केसांना चमक येऊ लागते.

सिताफळाचे पाने:- सीताफळाचे पान स्वच्छ धुऊन त्यांचे पेस्ट तयार करून घ्या आणि ही पेस्ट तुमच्या केसांना लावा. असे केल्यामुळे केसांची वाढ चांगली राहते आणि केसांना चांगली चमक मिळते. हे सगळे उपाय करत असताना तुम्ही एक तेल सुद्धा बनवू शकता, त्यासाठी तुम्हाला पुढील सामग्री घ्यायची आहे. ते म्हणजे आवळा आवळ्याला आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.

जर तुमच्याकडे आवळा असल्यास तो चिरून घ्या मग त्याची पेस्ट म्हणून तुम्ही त्याचे तेल तयार करू शकता किंवा जर तुमच्याकडे ताजा आवळा नसल्यास तुम्ही आवळ्याची पावडर सुद्धा वापरू शकता. नियमितपणे हे तेल तुमच्या केसांना लावा असे केल्याने तुमचे नेहमी गळणारे केस केसातील कोंडा व केसांची वाढ न होणे केस विभाजन होणे टक्कल पडणे यासारख्या समस्या पासून तुम्हाला मुक्तता मिळेल.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना हि माहिती शेअर करायला जरूर विसरू नका.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.