अलिकडील काळात मानवी जीवन हे अत्यंत ध’काध’कीचे आणि प्रचंड अस्थिर बनले आहे. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच योग्य काळजी न घेतल्याने मानवी श’रीराला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. त्यातीलंच एक प्रमुख आजार म्हणजे मधूमेह. भारतात डायबिटीसने ग्रस्त रूग्णांची संख्या लागोपाठ वाढत आहे.
अनेकदा या रोगाची माहिती शा-रीरिक समस्या झाल्यावर मिळते, पण काही शारीरिक लक्षणे अशी असतात, ज्यांनी हा इशारा मिळतो की, भविष्यात तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका वाढू शकतो. अशाच काही लक्षणांबाबत तुम्हाला माहिती असली पाहिजे. अशात लवकरात लवकर ब्लड टेस्ट करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला डायबिटीस आहे किंवा नाही.
ही काही मधुमेहाची दिसणारी प्राथमिक लक्षणे आहेत ज्यामुळे वेळीच तुम्हाला सावध होता येईल. पहिलं महत्वाचे लक्षण म्हणजे तीव्र भूक लागने, खूप अशक्तपणा जाणवणे, ही सुद्धा मधुमेहाचीच लक्षणे आहेत. मधुमेह असलेल्या व्यक्तीला अचानकपणे अशक्तपणा येतो. रूग्णाच्या शरीरात जेव्हा उच्च रक्तदाब असते तेव्हा शरीराला ग्लुकोजला मॅनेज करताना अडचण निर्माण होते.
दुसरे लक्षण म्हणजे वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे देखील मधुमेहाला निमंत्रण देते. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. वजन घटण्याचे दोन कारणे असतात, एक वारंवार वॉशरूमला जाणे आणि दुसरे म्हणजे श’रीरातील वाढत्या कॅलरीजवर नियंत्रण ठेवता न येणे.
तिसरे लक्षण आहे जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटणे. वारंवार ल-घवीला लागने. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागविण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
चौथे लक्षण म्हणजे मधुमेहाच्या सुरूवातीच्या काळात डोळ्यांना अचानक अंधारी येणे. निट न दिसणे. अशी लक्षणे दिसतात. पण, मधुमेहात नजर कायमची अधू होत नाही. काही कालावधीनंतर रूग्णाची नजर स्थिर होते. त्याला निट दिसू लागते. पाचवे लक्षण म्हणजे पायाला सतत मुंग्या येणे. पायाला सतत मुंग्या येत असतील अधुनमधून पाय बधीर होत असेल तरीही डॉ’क्टरांचा सल्ला त्वरीत घ्या.
सहावे लक्षण असे की शरीरावर झालेली कोणतीही जखम लवकर भरून न येणे. जखम चिघळत जाणे. जखमेत खाज होणे अशी लक्षणे दिसताच डॉ’क्टरांचा सल्ला त्वरीत घ्या. हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. सातवे लक्षण म्हणजे कामात लक्ष न लागणे, एकाग्रता कमी होणे हे सुद्धा ब्लड शुगर लेव्हल वाढण्याकडे इशारा करतात. अशा वेळी घाबरून न जाता तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य आ’रोग्य चाचणी करून उपचार सुरू करावेत.