मुळव्याध, फिशर, भगंदर हे तीनही अत्यंत वे’दनादायी आणि लवकर बरे न होणारे असे आजार आहेत. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी याला मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. आज आम्ही एक असा उपाय घेऊन आलो आहे जो वरील तीन पैकी कोणत्याही आजारावर एकच उपाय आपण करू शकता आणि या आजारांपासून कायमची मुक्ती मिळवू शकता.
हा उपाय करण्यासाठी आपणाला दोन वस्तू लागणार आहेत. चांगले पिकलेले केळे आणि चण्याएवढा देशी कापूर. तसेच हा उपाय करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती ही आज आम्ही आपणास सांगणार आहोत.
पिकलेले केळे हे बद्धकोष्टतेच्या आजारासाठी खूप चांगले असते. शिवाय हे अत्यंत गोड असल्यामुळे पित्त ही नष्ट करते पिकलेले केळे खाण्याबरोबरच बद्धकोष्टता साठी दिवसातून भरपूर प्रमाणात पाणी पिणे ही गरजेचे आहे.
देशी शुद्ध कापूर हा मुळव्याध फिशर भगंदर यासाठी एक गुणकारी औषध आहे. हा कापूर म्हणजे आपण देवासाठी जाळतो तो कापूर घ्यायचा नाही. खाण्याचा कापूर वेगळा असतो तो आयुर्वेदिक औषधाच्या दुकानातून आणावा. हा कापूर जास्त घ्यायचा नाहीये तो सांगितल्याप्रमाणे एका चण्याच्या आकारा इतकाच आपल्याला घ्यायचा आहे.
पद्धत पहिली: चांगल्या पिकलेल्या केळ्याचे सोलून तुकडे करून घ्या. हे केळ्याचे तुकडे आपणास न चावता गिळायाचे आहेत. या तुकड्यांमध्ये चण्या एवढा कापूर रुतून ठेवा आणि हा तुकडा तसाच गिळून टाका. वाटल्यास त्यावर थोडे पाणी पिऊ शकता. शुद्ध देशी कापूर हा चवीला अत्यंत कडू असल्यामुळे हा अशाप्रकारे केळ्यातून घ्यायचा आहे.
पद्धत दुसरी: वर सांगितलेल्या प्रमाणातील कापराची बोटाने चुरून बारीक पूड तयार करा. ही पूड केळ्याच्या तुकड्या वर टाका आणि तो तुकडा पहिल्या पद्धतीप्रमाणेच घेऊन टाका त्यावर थोडे पाणी प्या.
वरील उपायाने आपणास मुळव्याध, फिशर, भगंदर या त्रासात नक्कीच आराम पडेल. याचबरोबर तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. भरपूर पाणी प्या. रोज थोडा तरी व्यायाम करा.
मित्रांनो आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद.