कावळा देतो आपले भाग्य बदलण्याचे हे संकेत..शुभ की अशुभ घडणार..काय आणि कसे असतात हे संकेत जाणून घ्या..

अध्यात्म

मित्रांनो ज्योतिष शास्त्रात असे सांगितले आहे की पक्षांना दाणे किंवा पाणी दिल्यास आपल्या पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते व आपल्याला सफलता प्राप्त होते. कितीतरी पक्षी असे असतात की जे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देतात या पक्ष्यांपैकी एक पक्षी आहे कावळा तुम्हाला कावळ्यामुळे आपल्या जीवनात कोणते शुभ व कोणते अशुभ फळ मिळते हे सांगणार आहे.

प्राचीन कथेत असा उल्लेख आहे की कावळ्याने अमृताची चव चाखली होती.या शिवाय दुसरी एक कथा अशी आहे श्री रामाकडून कावळ्याला असा आशीर्वाद मिळालेला आहे की कावळ्यांना दिलेले भोजन आपल्या पितरांना मिळते. कावळ्यांना शनी देवाच्या वाहनाच्या रुपात ही पाहिले जाते तसेच कोणतेही आ त्मा कावळ्याच्या शरीरात प्रवेश करून विचरण करू शकते म्हणूनच पितरांचे आश्रय स्थान म्हणून कावळ्याकडे पाहिले जाते.

कावळ्यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधिच मिळतात. आज आपण जाणून घेणार आहोत कावळ्याचे शुभ अशुभ संकेत.तसं बघायला गेलं तर कावळ्याला अशुभ समजलं जातं कावळ्याच महत्त्व फक्त दहाव्या व तेराव्याला आहे पण आज आपण कावळ्या बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

कावळ्याला आपण आपल्या घरातील एक वस्तू खाऊ घातली तर आपल्या घरी कधीही पैश्याची कमी पडणार नाही. लक्षात ठेवा जर तुम्हाला सकाळी-सकाळी कावळा दिसला तरच कावळ्याला खाऊ घाला तेव्हाच तुम्हाला याचा फायदा होईल हिंदू वेद पुराणानुसार असे म्हटले गेले आहे की सकाळी कावळ्याला काही तर खायला दिल तर आपल्याला पुण्य मिळत.

हे वाचा:   सकाळी उशिरा अंघोळ करणाऱ्या महिलांनी नक्कीच हा लेख वाचा; नाहीतर येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

भारतीय परंपरेत कावळ्याला अशुभ मानल गेलं आहे कावळ्याला संबंध यम राजाशी जोडला गेला आहे कर्कश असा काव काव आवाज आणि काळा रंग ही कावळ्याची मुख्य ओळख आहे. सकाळी उठल्यावर तुम्हाला कावळा दिसला तर घरून एखादी रोटी किंवा इतर कोणताही पदार्थ घेऊन कावळ्याला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला पुण्य तर मिळेच तसेच कुबेर देव खुश होऊन तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात.

कावळ्याला जरी अशुभ मानले गेले असले तरी कावळा काही संकेत देत असतो ते संकेत कोणते आहेत हे आपण जाणून घेऊ. कावळा जमिनीवर चोच मारून खायला शोधत असतो जर अस करताना कावळा तुमच्या दृष्टीस पडला तर तुम्हाला अचानक धन लाभ होण्याची शक्यता असते.

जर तुम्ही पुढे जात असताना पाठीमागून कावळ्याच्या आवाज आला तर त्याचा अर्थ असा असतो की तुमचे सर्व सं-कटे दूर गेली आहेत पाठीमागून कावळ्याच्या आवाज येण याला सुद्धा शुभ शकुन मानला जातो. कावळा जर आपल्या घराच्या छतावर बसून ओरडत असेल तर आपल्या घरी कोणी पाहुणे येणार आहेत असा त्याचा अर्थ आहे पण अनके कावळे मिळून घराच्या छतावर बसून ओरडत असतील तर ती आपल्या घरी संकट येण्याची चाहूल असते कावळा ओरडून आपल्याला संकटापासून सावध करत असतो.

घरासमोर खूप सारे कावळे एकत्र येऊन ओरडतात ते सुद्धा एक अपशकुन मानला जातो. जर यात्रा सुरू करण्यापूर्वी कावळ्याला दही भाताचा नैवेद्य दाखवल्याने यात्रा चांगली पार पडते. कावळ्यानी डाव्या बाजूला येऊन नैवेद्य ग्रहण केल्यास यात्रा निर्विघ्न संपन्न होते. कावळा मागून आल्यास प्रवासाला फायदा होतो. कावळ्यानी समोरून येऊन नैवेद्य ग्रहण केल्याने कार्य सिद्ध होते.

हे वाचा:   यमराज तुम्हाला हात पण लावणार नाही ! महादेव भक्तांनी आवश्य बघा..अकाल मृत्यू रोखणारा सिद्ध मंत्र..

नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा विहरीच्या पाळीवर,नदी काटावर जाऊन बसल्यास हरवलेली वस्तू परत मिळते आणि धन धान्य लाभते. नैवेद्य खाल्ल्यावर जर कावळा बंगला किंवा घराच्या छपऱ्यावर किंवा हिरव्या झाडावर जाऊन बसल्यास अकस्मात धन लाभ प्राप्तीचे योग असतात. तोंडात पोळी किंवा फळ व मासाचा तुकडा कावळ्याच्या तोंडात पाहिलं तर कामात यश लाभत.

कावळा गाईच्या पाठीवर बसून आपली चोच रगडताना दिसल्यास उत्तम भोजनाची प्राप्ती होते. कावळा आपल्या चोचीत कोरडी गवत घेऊन जाताना दिसल्यास धन लाभ होतात. कावळ्याच्या चोचीत फुल किंवा पाने दिसल्यास आपली मनातली इच्छा पूर्ण होते. कावळा धान्याजवळ बसलेला दिसल्यास धान्य लाभ होत.

आणि गाईच्या डोक्यावर बसलेला दिसल्यास प्रियजनांची भेट होते. उंटाच्या पाठीवर कावळा दिसल्यास यात्रा कुशल होते. डुकराच्या पाठिवर कावळा बसलेला दिसल्यास प्रचंड संपत्ती भेटते. जर कावळा धुळीत लोळताना दिसला तर त्या जागी पाऊस पडण्याची शक्यता असते.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.