कडिपत्त्याची ४-५ पाने वापरा आणि चार दिवसांत केस गळती त्वरित थांबेल, कसे घनदाट करणे घरगुती उपाय..केस काळेभोर..

आरोग्य

आपल्यापैकी अनेक लोकांचे केस कमजोर झालेले असतात किंवा निर्जीव झालेले पाहायला मिळतात. तसेच याशिवाय केसांमध्ये अजिबात चमक नसते. मग अशा प्रकारच्या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी असतो. कारण केस हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
त्यामुळे अनेक लोकांचे केस हे त्यांना अत्यंत प्रिय असतात.

कारण स्वच्छ आणि लांब केसांमुळे आपल्या शरीराला आणि सौन्दर्याला शोभा येत असते. म्हणूनच केस हे आवश्यक असतात,त्यामुळे केस आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक बनला आहे. आपले केस हे केराटिन नावाच्या प्रथिनांपासून बनलेले असतात,त्यामुळे केस हे विघटनक्षम असल्यामुळे, त्याचात गंधक हा घटक समाविष्ट असतो.

या गंधकामच्या प्रमाणावर आपल्या केसांचा रंग ठरत असतो. त्यामध्ये केसांचा रंग हा काळा किंवा लालसर होत असतो.काही जणांचे केस हे काळेभोर असतात, तर काही जणांचे तांबड्या, लाल, तांबूस रंगाचे असतात.  त्यामुळे आपल्याला या केसांची काळजी घेणे आवश्यक असते.

कारण आपण केसांची निगा राखली नाही तर, आपल्याला केसांच्याबाबतीत केस गळती, केस पांढरे होणे, केसांची वाढ न होणे यासारख्या अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या केस गळती विषयक तसेच केसाविषयक कोणत्याही प्रकारच्या समस्या निर्माण होऊ नये, म्हणजे काही आयुर्वेदिक घरगुती उपाय केले पाहिजे.

हे वाचा:   फक्त गरम पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरात हे मोठे बदल होतात…आजच जाणून घ्या

या घरगुती उपायांसाठी आपल्याला कडुनिंब किंवा कढीपत्ता या स्वयंपाक घरात दररोज वापरला जाणाऱ्या दोन पदार्थांची आवश्यकता लागणार आहे.हे पदार्थ आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात. मग आपल्याला सर्वप्रथम कडीपत्ता घेऊन ,तो सावलीमध्ये सुकवून, त्याची मिक्सरमध्ये पेस्ट करावी.कारण ताज्या कडुनिंबाची पेस्ट केसांना लावल्यामुळे, केस हे घनदाट आणि मजबूत होतात.

याशिवाय कढीपत्ताला आयुर्वेधामध्ये महत्वाचे स्थान आहे. कारण कढीपत्त्याच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात फॉस्फरस, व्हिटॅमिन क तसेच कॅल्शियम, आयर्न यांचा समावेश असतो.तसेच यातील कोयजीनीन ग्लुकासाइट्स नावाचा घटक पांढरे झालेल्या केसांना काळे करण्यास मदत करतो. तसेच केसांना पोषण करण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

मग या 1 चमचा कढीपत्त्याच्या पेस्टमध्ये 2 चमचे नैसर्गिक मेहंदी आणि त्यामध्ये 2 चमचे एरंडाचे तेल आणि दही मिक्स करून आपल्या केसांच्या मुळांना योग्य प्रकारे लावल्यास, आपले केस एकदम मऊ होण्यास सुरुवात होतात. साधारपणे हे पूर्ण एकत्रित मिश्रण 1 तास ठेवून, मग केस धुवून घ्यावेत.

हे वाचा:   आज रात्री झोपण्याआधी करा हा उपाय; रात्रीचे घोरणे कायमचे होईल बंद.!

याशिवाय आपल्याला केसात कोंडा असल्यास, या मिश्रणात थोडेसे दही टाकून हे मिश्रण केसांना लावल्यास, आपल्या केसांमधला कोंडा जाण्यास मदत होईल.कारण आपल्या केसांना आवश्यक असणारी ७०% पोषक तत्वे ही दह्यामध्ये असतात. एरंडेल तेलामुळे ओले केस हे नवीन उगवण्यासाठी आणि आपले केस दाट करण्यासाठी उपयुक्त आहे. हा आयुर्वेदिक घरगुती उपाय तुम्ही आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा करावा.या उपायांमुळे आपले केस मऊ, मजबूत आणि घनदाट होतील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.