सध्याचे युग हे धावपळीचे आहे. यामध्ये शरीराच्या अनेक समस्या आपल्याला होत असतात. यातील मुख्य समस्या म्हणजे पोटात गॅस धरणे, अपचन, ऍसिडिटी, मळमळ या सर्व पचना संबंधीच्या समस्याना आपल्याला तोंड द्यावे लागते.
पोटात गॅस होण्याची कारणे म्हणजे अनियमित जेवण हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. हल्ली आपली दिनचर्या फार बदललेली आहे अनेक वेळा अनेक गोष्टींसाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे वेळच्या वेळी जेवण आपणास मिळत नाही आणि त्याचे दुष्परिणाम शरीराला भो’गावे लागतात.
रात्री उशिरापर्यंत जागरण करणे हे ही याचे एक महत्त्वाचे कारण आहे आपल्यातील अनेक लोक काही जण कामामुळे तर काही जण करमणुकीसाठी जागरण करत असतात आणि त्यांना ही समस्या होते. जागरण हे आपण कटाक्षाने टाळले पाहिजे. आरोग्य शास्त्रानुसार रात्री दहा ते सकाळी सहा ही वेळ झोपेसाठी उपयुक्त मानली जाते.
आपण विचार करावा यातील आपण ही वेळ आपण किती पाळतो? जर रात्रीच्या वेळी जड किंवा जास्त प्रमाणावर जेवण झाले मग तर जागरण अजिबात करू नये. बाहेरचे खाणे जर जास्त प्रमाणावर असेल तर पचना संदर्भातल्या समस्या ह्या होतात. फास्ट फूड, जंक फूड, तळलेले खारवलेले चटकदार पदार्थ हे आ’रोग्यासाठी अत्यंत घा’तक असतात.
जर आपण खात असू तर ते अत्यंत कमी प्रमाणात खावेत. पुरेसे पाणी न पिणे हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे. शास्त्रानुसार दिवसातून पाच लिटर पाणी पोटात जाणे आवश्यक आहे ते जरी शक्य नसेल तरी किमान तीन लिटर तरी पाणी आपण पिले पाहिजे. आम्ही तुम्हाला एक खूपच सोपा उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमचे गॅसची समस्या कायमची दूर होईल.
आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक ग्लास ताक लागणार आहे. ताक हे शरीरासाठी अतिशय उत्तम मानले जाते. यासाठी आपल्याला आणखी एक पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे काळे मीठ. काळे मीठ हे पोटात खूपच चांगला परिणाम घडवून आणत असते. यामुळे शरीराला भरपूर असे फायदे होत असतात. ज्या लोकांना कफची समस्या खूपच भयंकर असेल अशा लोकांनी काळे मीठ नक्की खावे.
एक ग्लास ताकामध्ये चिमूटभर काळे मिठ टाकुन चांगले हलवावे. रोज आपले दुपारचे जेवण झाल्यानंतर हे ताक आपल्याला प्यायचे आहे. यामुळे आपल्या पचना सं-दर्भातील सर्व समस्या दूर होतील. मित्रांनो कसा वाटला आमचा लेख? आम्हाला जरुर कळवा लाईक करा, कमेंट करा आणि शेअर देखील करा. धन्यवाद
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.