नमस्कार मित्रांनो, औ’षधांच्या साईड इफेक्ट्सचा इतका मोठ्ठा बोलबाला करून ठेवला आहे आपल्या समाजात लोकांनी की दशकानुदशके अनेक शास्त्रज्ञांनी कष्ट करून शोध लावलेल्या औ’षधांची परिणामकारकता म्हणजे चांगले परिणाम सुद्धा आपण विसरून जातो. मानवाची वाढलेली आयुमर्यादा आणि जीवनाची सुधारलेली गुणवत्ता आज या सगळ्या औ’षधांमुळे आहे हे विसरून कसे चालेल?
एखाद्याला टायफॉईड झाला असेल तर त्याचा जीव प्रभावी अँटिबा’योटिक्स नेच वाचतो मग त्या अँटिबा’योटिक्समुळे जरा पित्त झालं,पोट बिघडलं ,तोंडाची चव गेली अशा तक्रारी करणे म्हणजे आग विझवायला आलेल्या अ ग्नि शमन वाहनाचा आवाज फार जास्त होतोय अशी तक्रार करण्यासारखे आहे.
अशा वेडसर समजुतीमुळे काही लोक मधुमेह, रक्तदाब यावरची औ’षधे आपल्या मनानेच बंद करतात आणि स्वतःच्या तब्येतीची फार मोठी जो खी म पत्करतात. साईड इफेक्ट्स च्या अनाठायी भीतीमुळे बीपीची औ’षधे बंद केली आणि पॅरालिसिस चा झटका येऊन जन्मभर अंथरुणाला खिळलेले रुग्ण आम्ही बघत असतो.
मधुमेहाची औ’षधे मनानेच बंद केल्यामुळे शुगर वाढून कोमात गेलेले पेशंट किंवा पायाच्या जखम चिघळून पाय कापावा लागणारे रुग्ण बघणे हे आता सामान्य आहे आयसीयु मध्ये काम करणाऱ्या डॉ’क्टरांसाठी दुसऱ्या बाजूला डॉ’क्टरांना न विचारता गुडघा दुखतो म्हणून मनानेच स्टिरॉइड सारख्या अतिधोकादायक गोळ्या घेणारीसुद्धा एक वेगळीच कॅटेगरी आहे.
मुळात जगातल्या कोणत्याही औ’षधाचे थोडेफार साईड इफेक्ट्स असतातच, मग ते औ’षध मॉडर्न मेडिसिनचे असो, की आयुर्वेदिक. त्या औ’षधाचे उपयोग आणि परिणामकारकता लक्षात घेऊन त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. काही वेळा जर हे साईड इफेक्ट्स जास्त नुकसानकारक आहेत असं वाटलं तर अशी औ’षधे बाजारात येऊ दिली जात नाही किंवा आली असतील तरी त्यावर बंदी घातली जाते.
तुम्ही कोणतेही औ’षधाचे ,अगदी पॅ’रासिटामॉल चे सुद्धा चांगले इफेक्ट्स सोडून साईड इफेक्ट्स कडेच लक्ष द्यायचं ठरवलं तर तुम्ही कधीच कुठलंच औ’षध घेऊ शकणार नाही. काही वेळा साईड इफेक्ट्स मा’नसिक पण असतात. पेशंट च्या मनात औ’षधांबद्दल आधीच पूर्वअनुमान असेल तर असतील नसतील ते सगळे साईड इफेक्ट्स दिसून येतात.
त्यामुळे प्रत्येक औ’षध देताना डॉ’क्टर साईड इफेक्ट्स बद्दल समजावून सांगत नाहीत. एखादा साईड इफेक्ट म्हणजे उदाहरणार्थ ऍसिडिटी होईल असं सांगितलं की पेशंट ला हमखास ऍसिडिटी होतेच आणि त्याबद्दल काही माहिती नसेल तर काहीच होत नाही हे आम्ही खूप वेळा बघतो. प्रत्येक डॉ’क्टरला शेवटी पेशंटची मा’नसिकता बघूनच उपचार करावे लागतात.
बऱ्याच वेळा पेशंट एकदा कधीतरी दिलेली औ’षधांची चिठ्ठी वापरून डॉ’क्टरांच्या सल्ल्याशिवायच परत परत ती औ’षधे घेत राहतात. साहजिकच त्याचे दुष्परिणाम दिसले की खापर औ’षधे आणि डॉ’क्टरच्या माथी मा’रून मोकळे होतात.
औ’षधे घेताना साध्या साध्या सूचनांचे पालन केले जात नाही. काही औ’षधे रिकाम्या पोटी,काही जेवण करून मग घ्यायची असतात तर काही औ’षधे एकत्र घ्यायची नसतात. या सुचनांकडे साफ दुर्लक्ष केल्यास पेशंटला त्रास होऊ शकतो. गोळ्या त्यांच्या रॅपर मधून काढून ठेवणेही चुकीचे आहे. त्यांची परिणामकारकता त्यामुळे कमी होऊ शकते.
त्यामुळे मित्रमंडळी पुढच्या वेळी डॉ’क्टरांनी औ’षधं लिहून दिली की याचे साईड इफेक्ट्स काय होतील हा विचार करण्यापेक्षा या औ’षधांनी तुम्हाला बरं वाटणार आहे हा विचार करा. शेवटी डॉ’क्टर आणि वैद्यकिय शास्त्र यावर मनापासून विश्वास नसेल तर तुम्हाला व्याधीमुक्त करणं आम्हाला खूप अवघड जाते. तर साईड इफेक्ट्स चं हे तुमच्या मानगुटीवरचं भूत उतरवून त्याला मुक्ती द्याल का एकदाच? बघा पटतंय का?
वरील लेख डॉ शिल्पा चिटणीस जोशी स्त्रीरोग व वं’ध्यत्व तज्ञ यांचा आहे. त्या कोथरूड, पुणे येथे कार्यरत आहेत. अशी उपयोगी माहिती आपण आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेअर करा.