आयुर्वेदाचा चमत्कार आहे खाऊचे पान..१४८ प्रकारचे रोग बरे होतात..दमा, शुगर, हाय बिपी, पोटाच्या तक्रारी कायमच्या बऱ्या होतात..

आरोग्य

मित्रांनो, आज आपण विड्याच्या पानांपासून कोणकोणते आजार दूर करू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर, विड्याच्या पानांचे फायदे देखील जाणून घेऊया. विड्याच्या पानांपासून आपण अनेक रोगांवर उपचार करू शकतो. विड्याच्या पानांची संस्कृती ही पूर्वापार चालत आली आहे. त्याचे उपयोग पूजा पाठ, भोजन पचण्यासाठी तसेच तोंडात स्वाद राहाण्यासाठी केला जातो.

तसेच विड्याच्या पानांशिवाय धर्मसंस्काराची कामेसुध्हा पूर्ण होत नाहीत. खूप कमी लोकांना हे माहीत आहे, की विड्याचे पान फक्त तोंडाची चव वाढवत नाही, तर अनेक आजारांपासून आपली सुटका करते. पान बनवण्यासाठी खूप पदार्थांचा वापर केला जातो जसे की, चुना, काथ, सुपारी, गुलकंद, चिंचेची पाने, लवंग, वेलची जे आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात.

तर आज आपण असेच काही विड्याच्या पानांची उपयोग जाणून घेणार आहोत.

पायरीयापासून वाचण्यासाठी: प्रथम आपण तोंडाबद्दल बोलूया. पायरीया हा एक तोंडाचा रोग आहे. तर असे बरेच लोक आहेत ज्यांना दातांमध्ये पायरीया हा आजार असतो. त्यासाठी ते अनेक प्रकारची औ’षधे घेतात, तसेच अनेक प्रकारचे उपाय करायला ते विवश होतात. परंतु, विड्याच्या पानांमध्ये १० ग्राम कापुर मिसळून जर ते पान दिवसात २ ते ३ वेळा खाल्ले, तर त्यांची ही अडचण नक्कीच दूर होऊ शकतो. त्यांनी फक्त इतकीच सावधानता बाळगायची आहे, की त्यात कापुर असल्यामुळे त्यांनी पानांचा रस तोंडातून आतमध्ये न घेता तो बाहेर थुकून टाकायचा आहे.

हे वाचा:   असाध्य ते साध्य करणारे आयुर्वेदिक पेय; ज्याने होतील चुटकीत कायमचे आजार बरे.!

पान फक्त पायरीयाच नाही तर तोंडाचे स्वास्थ्य उत्तम ठेवते. कारण यामध्ये असे काही तत्व आहेत, जे बॅक्टीरिया म्हणजेच तोंडातील जंतूंचा प्रभाव कमी करतात आणि तोंडाला येणारा दुर्गंध नाहीसा करतात. त्यात वापरलेला काथ, वेलची, लवंग हे तोंडाला ताजेतवाने ठेवायला मदत करते. जी व्यक्ति रोज पान खाते, त्यांच्या लाळेत अस्कर्बिक अॅसिडचे प्रमाण असल्यामुळे हे तोंडाचे स्वास्थ्य उत्तम ठेवते. हिरड्यांना चांगले ठेवते. जर तुम्हाला खोकला असेल, तर तुम्ही हळद गरम करून विड्याच्या पानांमध्ये ठेवून ते पान खाल्ले पाहिजे. तुम्हाला जर खोकल्याबरोबर सर्दी असेल, तर त्यासाठी पानात थोडी लवंग मिसळा, त्यामुळे सर्दी कमी होईल.

किडणीच्या आजारापासून आराम: ज्या व्यक्तींना किडनीचा आजार आहे, त्यांनी सकाळ संध्याकाळ विड्याच्या पानांचे सेवन करावे. त्यामुळे त्यांच्या पोटातील घाण स्वछ होते. अशा लोकांनी खूप मिरची किंवा मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये. दारू, अंडे, मास यांचे सेवन करू नये.

श्वासासं’बंधी अडचणी: जर कोणाला श्वसनाचा त्रास असेल, तर विड्याच्या पानांचे तेल गरम करून हे तेल तुमच्या छातीवर हलके लावा. हा उपाय एक महिना करून बघा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. लघवी कमी होणे: काही लोकांना हा त्रास असतो. ज्यामुळे त्यांना पोटाच्या तक्रारी उत्पन्न होतात. यासाठी विड्याच्या पानांचा रस काढून तो पातळ दुधाबरोबर घ्या. त्यामुळे तुमची अडलेली लघवी पूर्ववत होते.

हे वाचा:   चुकूनही खाऊ नका हे 4 पदार्थ, तुमची किडनी यामुळे वेळेआधीच होते खराब..जाणून घ्या नाहीतर उशीर होईल

त्वचेला तजेला: विड्याच्या पानांमध्ये असे काही अॅंटी-ओक्सिडेंट तत्व आहेत, ज्यामुळे त्याच्या सेवनाने तुमचे सौन्दर्य वाढते. हे तुमचे रक्त स्वछ करायला मदत करते. रक्ताच्या गुठळ्या किंवा गाठ: ज्या लोकांना हा त्रास आहे, त्यांनी विड्याच्या पाने वाटून त्यात एरंडेल तेल मिसळून एक पेस्ट तयार करून घ्यावी व जिथे गुठळी झाली आहे त्या जागी लावावी. कामभावना: ज्यांचे नवीन लग्न झाले आहे, ते विड्याच्या पानांचे सेवन करतात कारण त्यामुळे कामभावना वाढते व तुम्ही जोडीदाराला खुश करू शकता.

इतर उपयोग: जेवण पचवण्यासाठीसुद्धहा पान उपयोगी आहे. डोकेदुखीसाठी पान अतिशय उपयोगी आहे. तसेच जखम भरण्यासाठी याचा उपयोग केला जातो. जर तुमच्या तोंडात छाले पडले असतील, तर विड्याच्या पानांचा रस कोमट करून लावल्याने आराम मिळतो. भूक वाढवण्यासाठी विड्याच्या पानांचा उपयोग नक्की करू शकतो. म्हणून, विड्याच्या पानांचा उपयोग योग्य पद्धतीने जरूर करा.