कोजागिरी पौर्णिमेला देवघरात ठेवा ही एक वस्तू..लक्ष्मी सदैव घरात वास करेल..बघा या दिवशी रात्री लक्ष्मी माता आपल्या आसपास..

अध्यात्म

मित्रांनो, आता अश्विन महिना चालू आहे. आणि अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. तर कोजागिरी पौर्णिमा ही मंगळवारी 19 तारखेला चालू होते. कोजागिरी पौर्णिमा रात्री 7 वाजून 2 मिनीटांनी सुरुवात होते आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी रात्री 8 वाजून 25 मिनिटापर्यंत आहे. मग प्रश्न असा आहे की कोजागिरी पौर्णिमेचा दिवस कोणता मानावा तर खऱ्या अर्थाने शास्त्रात असे वर्णन आहे की ज्या वेळेला सुर्यनारायन जी स्थिती पाहतो तीच स्थिती गृहीत धरली जाते.

19 ऑक्टोबर या दिवशी कोजागिरी पौर्णिमा आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्राची पूजा करतात आणि लक्ष्मीची पूजा करतात. रात्री 12 पर्यंत जागरण करून लक्ष्मी आणि इंद्र या दोघांचे पूजन करतात. आणि यावेळेस कोजागिरी पौर्णिमेचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि इंद्र देव हे आपल्या आसपास भ्रमण करत असतात.

म्हणून या दिवशीला अत्यंत महत्व आहे. आपल्या घरात माता लक्ष्मी वास करावी भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहावी असे प्रत्येकाला वाटत असते. म्हणून आज काही गोष्टी आपण जाणून घेणार आहे. या मुहूर्तावर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवघरामध्ये फक्त एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे आणि ती वस्तू अतिशय सोपी आहे व प्रभावशाली आहे. मग काहीजणांना प्रश्न पडतो की देवघरामध्ये एखादी वस्तू ठेवल्यानंतर कुठे लक्ष्मीची प्राप्ती होते का?

हे वाचा:   काळे उडीद करतील शत्रूचा नाश; कोणतीही काळ्या प्रकारची जादू होईल पूर्णपणे नष्ट.!

पण काही विशिष्ट मुहूर्त असतात काहि विशिष्ट काळ असतात. त्या काळामध्ये आपण त्या त्या देवतांचे पूजन केल्यानंतर ते देवता आपल्यावर प्रसन्न होत असतात. तसेच आपल्याला कष्ट तर करावेच लागणार पण त्यासोबतच काही पूजन जर आपण केलात तर मार्ग हा अतिशय सुफळ आणि व्यवस्थित मार्ग आपल्याला सापडेल. आपल्याला जर वाटत असेल माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असावा तर ही गोष्ट आपल्याला करायलाच पाहिजे.

तर शक्य तो आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असावा. माता लक्ष्मी विष्णूंचे पाय दाबत असतील तो फोटो जर असेल तर अतिशय उत्तम आहे. कारण ज्या ठिकाणी नवऱ्याची सेवा होते व नवऱ्याला मान मिळतो त्या ठिकाणी बायकोला यावेच लागते. म्हणून जर लक्ष्मी प्राप्त करायची असेल तर आधी भगवान विष्णूंची आराधना करावी लक्ष्मी आवश्य येईल.

हे वाचा:   घरामध्ये हत्तीची मूर्ती ठेवल्यावर काय होते..? परिणाम जाणून हैराण व्हाल..!

आणि शक्य तो आपल्या घरात जी माता लक्ष्मी आहे ती कमळामध्ये बसलेली असावी. आणि उभी लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती कधीही घरामध्ये असू नये. तर उभी लक्ष्मी काही ठिकाणी दुकान ठेवतात कारण त्या ठिकाणी लक्ष्मी सतत धावत असते. पण घरातमध्ये खऱ्या अर्थाने लक्ष्मी असावी ती बसलेली लक्ष्मी असावी.

त्याचबरोबर आपल्या घरात एक गोष्ट आवश्य पाहिजे ती म्हणजे श्री यंत्र आवश्यक ठेवावे या श्री यंत्रचे फार मोठ महत्व कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आहे. त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरात कवडीचे हळद, कुंकू, फुले अक्षदा वाहून पूजन करावे. कारण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कवडी पूजन हे अत्यंत महत्वाचे आहे.

आणि जर शक्य झालं तर कोजागिरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये श्रीसुक्ताचे पाठ आवश्य करा. रात्री 12 पर्यंत हे पाठ आपल्याला करायचे आहे त्यानंतर हळवलेली बासुंदी चंद्राला व देवाला अर्पण करायची व नंतर ते नैवेद्य आपण ग्रहण कराचे.