आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींचे वय कमी असून देखील इतर व्यक्तींना आपले वय जास्त दिसते. तर मित्रांनो असे का ? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल. कारण मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या, बऱ्याच व्यक्तींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात, काळे डाग पडतात, चेहऱ्यावर तेज राहत नाही, अनेक उपाय करूनही चेहऱ्यावरील पिंपल्स, पुरल्या कमी होत नाहीत.
चेहऱ्यावर असलेला वांग कमी होत नाही. आणी इतर कोणतीही क्रिम चेहऱ्यावर लावली तर तो वांग कमी होण्यापेक्षा जास्तच वाढत राहतो. आणी चेहरा काळा पडायला लागतो. मित्रांनो यावरती आजचा उपाय हा अत्येंत फायदा देणारा लाभदायक आहे. या उपायाने चेहरा उजळ, तेजस्वी, चमकदार होईल. मित्रांनो हा उपाय अत्येंत सोपा असून घरच्या घरी करण्यायेण्यासारखा आहे.
मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक फेशियल तयार करायचं आहे. चला तर मग मित्रांनो हा उपाय कसा करायचा हे जाणून घेऊया.. एकवेळचा फेसपॅक बनवण्यासाठी आपल्याला पहिला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बटाटा. आणी मित्रांनो आपल्याला या बटाट्याचा रस काढायचा आहे. बटाट्याचा रस काढायचा हे आम्ही सांगणार आहोत.
तर यासाठी १ बटाटा स्वच्छ धुऊन घ्या. आणी हा जो बटाटा आहे तो आपल्याला खिसणीवर खिसून घ्यायचा आहे. मित्रांनो एक महत्वाची गोष्ट ज्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात अशा व्यक्तींनी अंघोळ केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आणी मित्रांनो ज्या व्यक्तींना चेहऱ्यावरती वांग आहे, चेहऱ्यावरती काळे डाग आहेत,
अशा व्यक्तींनी कच्च्या अक्रोडाचा रस आपण जर चेहऱ्याला लावला तर वांग आणी काळे डाग पूर्णपणे कमी होतात. तसेच जो आपण बटाट्याचा रस काढलेला आहे तो साधारणत: ४ चमचे असायला पाहिजे. आपल्याला या ४ चमचे बटाट्याच्या रसामध्ये दुसरा जो घटक मिसळायचा आहे तो म्हणजे हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ. या मुगाच्या डाळीचे मिक्सर मध्ये बारीक वाटून याचे पीठ बनवायचे आहे.
मुगाच्या डाळीमचे जिंक आणी पोटॅशिम असते जे चेहऱ्यावरील मृ’त पेशी काढून नवीन त्वचा तयार करते. त्यातील व्हिटामिन A आणी व्हिटामिन C मुळे त्वचा सुरक्षित राहते. आता या ४ चमचे बटाट्याच्या रसामध्ये पूर्णपणे १ चमच्या डाळीचे पिठ आपल्याला मिक्स करायचे आहे. हे पूर्णपणे एकजी’व होऊपर्यंत मिक्स करून घ्यायचे आहे.
आणी हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला साधारणतः १० मिनिट तसेच ठेऊन द्यायचे आहे. आता हा आपला फेशियल पॅक तयार झालेला आहे. आता मित्रांनो हा फेसपॅक आपल्याला चेहऱ्यावरती लावायचा आहे. १५ मिनिटे ठेऊन आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आठवड्यामध्ये ३ दिवस हा फेसपॅक आपण लावू शकता. याचा कोणताही साईडइ’फे’क्ट नाही.
मित्रांनो जर एखाद्याची त्वचा कोरडी असेल तर यामध्ये साधारणतः अर्धा चमच्या बदाम तेल मिक्स करून लावले तर याचा खूप परिणाम मिळेल. तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग निघून जातील, तुमचा चेहरा तेजस्वी आणी सुंदर दिसू लागेल. मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना तसेच तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती त्यांनाही मिळेल.