रात्री भिजवून ठेवा, सकाळी प्या, वजन कमी होतांना स्वतः पहा ! नैसर्गिक रित्या वजन कमी करण्याचा जबरदस्त उपाय..

आरोग्य

आ’रोग्यमं धनसंपदा या म्हणीचा अर्थ सर्वानाच आपल्या जीवनात लागू करायचा आहे,कारण सध्याचे जीवन खूप धकाधकीचे बनले आहे, त्यामुळे फास्ट फूड, जंक फूड, खाण्याचे वाईट सवयी, अवेळी खाणे, पाणी न पिणे आणि व्यायामाचा अभाव यामुळे शरीर स्थूल होत चाललंय. अशामध्ये वजन भरपूर वाढते व श’रीराचा वाढलेला घेर त्रासदायक ठरतो, आ’रोग्याच्या समस्या वाढवतो.

जिम, डाएटच्या आधारे वजन कमी कसं करता येईल याकडे मग तुम्ही लक्ष देता. पण काही जणांना हे सारं करत असताना थकवा जाणवतो. अधिक वर्कआउट आणि अधिक डाएट म्हणजे झटपट वेट लॉस असा काही जणांचा समज असतो. पण जर तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला तर यामुळे तुमच्या निरोगी आ’रोग्याला कोणत्याच प्रकारचा धोका निर्माण होत नाही. तसेच तुम्ही थकून देखील जात नाही. तुमची एनर्जी टिकून राहते.

हा जो घरगुती पण आयुर्वेदिक उपाय आहे त्यामुळे तुमचं आ’रोग्य फि’ट राहील, इतर कोणतेच व्याधी, स’मस्या, त्रास राहणार नाहीत.
यामुळे फक्त वजनच कमी होत नाही तर ऍसिडिटी , पोट दुखी या समस्या ही कमी होतात. शरीराची दुर्गंधी, फंगल इ’न्फेक्शन निघून जाते. जिरे फक्त खाण्याची चव वाढवत नाही तर ते जिरे आपल्या स्किन करता, केसांच्यासाठी, त्वचे करता, फंगल इन्फेक्शन करता तसेच वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

कारण जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन सी, के, बी1 ,बी2 ,बी3 हे व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात तसेच प्रोटीन , कॅल्शियम ,मॅग्नेशियम , पोटॅशियम, झिंक, कॉपर, आयर्न, कार्बोहायड्रेट ही तत्वे भरपूर प्रमाणात असतात. त्याचा आपल्या आ’रोग्यासाठी खूप फा’यदा होतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वच्या सुंदर तर ठेवतेच स्किन टाईट करण्यासाठी देखील हा उपाय खूप बेस्ट ठरतो.

हे वाचा:   भेंडी चा करा असा वापर; शुगर ,मुतखडा वजन कमी ,पांढरे डाग होतील लवकर नाहीसे.!

तसेच शरीरात देखील रक्ताची कमी असेल तर जिऱ्यामध्ये असलेले आयन चे प्रमाण हे आपल्या श;रीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत करते. आणि हा जिरा अँटी फंगल गुणांनी युक्त असल्यामुळे फंगल इ’न्फेक्शनचा धोका टाळतो. त्यामुळे केसांची समस्या देखील दूर होते.

आ’रोग्य शास्त्रानुसार किचनमधील हा पदार्थ डोक्यापासून पायापर्यंत ज्या व्याधी आहेत त्या बऱ्या करण्याची ताकद यामध्ये आहे असे तज्ज्ञांनी सांगितले आहे. विविध खाद्यपदार्थ तयार करत असताना जिऱ्याचा उपयोग हमखास केला जातो. यामध्ये समाविष्ट असलेल्या अँटिऑक्सिडंट गुणांमुळे शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत मिळते.

तसेच जिऱ्यामुळे पचन क्रिया सुधारते. तसेच चयापचय क्षमता टिकून राहते. जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे वजन कमी करण्यास अधिक मदत मिळते. ताकामध्ये देखील जिरा पावडर मिक्स करून सेवन केल्यास भरपूर चांगला परिणाम शरीरावर होतो.दालचिनी शरीरातील न पचलेले घटक , गॅसेस दूर करते त्यामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

हा जो आयुर्वेदिक उपाय आहे, या उपायासाठी आपल्याला दोन लिटर पाणी , दोन चमचे जिरे आणि थोडी दालचिनी लागणार आहे. एका भांड्यात दोन लिटर पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा, त्यामध्ये दोन चमचे जिरे टाका आणि एक छोटा चमचा भरून दालचिनी पावडर टाका. या पाण्याला पूर्ण उकळून घ्या.

हे वाचा:   कच्चा लसूण उपाशीपोटी खात असाल तर हि माहिती एकदा नक्की वाचा; मिळतील असे फायदे जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.!

उकळी आल्यानंतर गॅस बंद करा आणि झाकण लावून ते भांडे तसेच ठेवा. हे काम आपल्याला रात्री करायचे आहे. सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून ठेवा. दिवसभर आपल्याला जेव्हापण पाणी प्यायच आहे तेव्हा तुम्ही हे तयार केलेले पाणी पीत रहा. दालचिनी मुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते आणि जिरे आपली पचनसंस्था सुधारते.

दिवसभर जेव्हा तुम्हाला हे पाणी प्यायचे असेल तेव्हा थोडं कोमट करून किंवा गरम करून प्या. ऑफिसमध्ये किंवा आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाणार असाल तर एका थर्मास मध्ये हे पाणी भरून घ्या आणि आपल्या कामाच्या ठिकाणीही हेच पाणी पीत रहा. याचे परिणाम थोड्याच दिवसात पाहून थक्क व्हाल, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचं वजन पूर्णपणे नैसर्गिकरित्या कमी होईल व तुम्ही निरोगी रहाल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.