पितृपक्षात चुकूनही खाऊ नका हा पदार्थ; अन्यथा पितर उपाशी राहतील..अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते..जाणून घ्या

अध्यात्म

भाद्रपद पौर्णिमेपासून सर्व पित्रे अमावस्येपर्यंत पितृपक्ष समजला जातो. या दिवसांमध्ये पितरांसाठीची तर्पण केले जातात पिंड दान केलं जातं, पितरांचे श्राद्ध केले जातात. जेणे करून पितर आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देतील. पितरांच्या कृपेनेच आपल्या जीवनामध्ये सर्व समस्या, संकटांचा नाश होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत. ज्या लोकांवर पितर अप्रसन्न असतात त्यांच्या घरात नेहमी अशांती असते असमाधान असत अश्या कुटुंबातील व्यक्तीला प्रत्येक कार्ययात अपयश मिळत.

पितृपक्षामध्ये पाळायचे अनेक नियम शास्त्रात संगितले आहेत. या दिवसांमध्ये शुभ कार्य विर्जित आहेत पण त्याचबरोबर काही वस्तू आहेत ज्या या दिवसांमध्ये चुकूनही खाऊ नयेत. ज्यामुळे पितर अप्रसन्न होतात आपल्याला त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. आज आपण पहाणार आहोत की अश्या कोणत्या वस्तू आहेत व असे कोणते पदार्थ आहेत. ज्या आपल्याला या पितृपक्षामध्ये खायचे नाहीत आणि पितरांच्या भोजनात ही या वस्तूंचा समावेश करायचा नाही.

मित्रांनो तुम्ही वडीलधाऱ्या कडून हे ही ऐकल असेल की पितृपक्षामध्ये पितरांसाठी तेच जेवण बनवावं जे पितरांना आवडत. जे पदार्थ पितरांना आवडतात तेच त्यांच्या भोजनामध्ये असावेश करता तेव्हाच पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. परंतु याच ठिकाणी आपल्या कडून न कळत काही चूका होतात अनेक घरातील लोकांना कांदा, लहसून याची आवड असते. आणि त्यामुळे ते लोक ते पितरांच्या जेवणामध्ये कांदा, लहसूनचा वापर करतात आणि ब्राह्मणांना हेच भोजन देतात. किंवा ज्या कुटुंबातील पितरांना मांसाहार आवडत होता ते लोक मांसाहार बनवून गरिबांना दान करतात.

हे वाचा:   महिलांना आकर्षित करण्याचा अद्भुत उपाय; स्त्रिया तुमच्यामागे खूपच आकर्षित होतील.!

जर तुम्ही ही अस करत आहात तर चुकूनही अशी चूक करू नका. शास्त्रानुसार पितृपक्षामध्ये कांदा, लहसून, मांसाहार, म द्य पा न हे टाळायला पाहिजे. चुकूनही अश्या पदार्थांचे सेवन करू नका आणि पितरांसाठी सुद्धा हे भोजन बनवू नका आणि ब्राह्मणाच्या भोजनात ही कांदा, लहसूनचा उपयोग करू नका. शास्त्रामध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीला पितृ देवता मानले गेले आहे. आपण जेव्हा पितरांना भोजन देतो तेव्हा हे भोजन प्रथमतः श्री विष्णू आणि माता लक्ष्मी स्वीकार करतात आणि नंतर पितर याचा स्वीकार करतात.

श्राद्ध तर्पण, पिंड दान हे ही प्रथम श्री विष्णू आणि माता लक्ष्मी स्वीकार करतात आणि त्यानंतर हे पितरांना मिळत. आणि माता लक्ष्मी व श्री विष्णूंच्या पूजेत मांसाहार, कांदा, लहसून हे विर्जित मानले गेले आहे. आणि श्री विष्णू व माता लक्ष्मी हे पितृ देवता असल्यामुळे जर यांनी जेवण स्वीकार केल नाही तर पितर सुद्धा हे जेवण स्वीकार करत नाहीत. लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा या पितृपक्षा दरम्यान कांदा, लहसून, मांसाहार यांचे सेवन करू नका.

तसेच या पितृपक्षा दरम्यान शीळ अन्न ही खाऊ नये आणि कोणाला देऊ ही नये जर तुमच्या दारावर एखादी गरजू व्यक्ती आली तर तर त्या व्यक्तीला सुद्धा शिळे अन्न देऊ नका. कारण, पितर हे आपल्या घरी कोणत्याही रुपात येऊ शकतात त्यामुळे आपल्या कडे जर या दिवसांमध्ये एखादी गरजू व्यक्ती आली तर तिला शीळ अन्न देऊन नका, मांसाहार किंवा कांदा लहसून पासून बनलेला पदार्थ ही देऊ नक्की.

हे वाचा:   मुलीला माहेरहून या 5 वस्तू चुकूनही भेट देवू नका; अन्यथा येईल पच्छाताप करण्याची वेळ.!

याचबरोबर मसुरीची डाळ, मसुरीची डाळ सुद्धा मांसाहारात मोडली जाते तर ही डाळ सुद्धा या दिवसांमध्ये विर्जित आहे. आणि पितरांसाठी भोजन बनवताना देखील ही डाळ वापरू नका.
आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेव्हा पितरांसाठी जेवण बनवणार आहोत तेव्हा त्या जेवणामध्ये काळ्या तिळांचाचा वापर अवश्य करा. किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तीला या दिवसांमध्ये दान करत असाल तर त्याच्या जेवणामध्ये सुद्धा काळ्या तिळांचा वापर अवश्य करा. जर भोजनामध्ये काळ्या तिळांचा वापर असेल तरच पितर ते भोजन ग्रहण करतात त्यामुळे या गोष्टीची विशेष काळजी घ्या.

तर या होत्या काही गोष्टी काही पदार्थ ज्या आपल्याला पितृपक्षात चुकूनही ग्रहण करायच्या नाहीत आणि पितरांच्या भोजनात ही या पदार्थांचा समावेश करायचा नाही.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.