ज्वारी, बाजरी, नाचणी..कोणती भाकरी शरीरासाठी चांगली आहे..जाणून घ्या कोणत्या आजारामध्ये कोणती भाकरी उपयोगी आणि कोणती भाकरी टाळावी..

आरोग्य

आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या घराघरांमध्ये भाकरी खाल्ली जाते. आरोग्य मजबूत राहण्यासाठी भाकरी ही खाल्ली पाहिजे,आपल्याला साधारणपणे माहिती आहे की बाजरी गरम आहे, ज्वारी थंड आहे आणि नाचणी पूर्ण थंड नाही किंवा पूर्ण उष्ण देखील नाही परंतु कोमट आहे. खरंच या तिन्ही धान्यांची सवय आपल्या शरीराला आ’रोग्यासाठी किती फा’यदेशीर आहे आणि हे धान्य कोणत्या काळात घेतले पाहिजे हे आपल्याला माहीत असायला हवे.

ज्वारी ही स्वभावाने थंड असते त्यानंतर बाजरी जी असते ती स्वभावतः उष्ण आणि नाचणी जी असते ती शीत ही आहे पण ती अति प्रमाणात शितल नाही आणि अति प्रमाणामध्ये गरम नाही. विशेष म्हणजे नाचणी ही कोमट असते जसे की पाणी गरम असतं आणि थंड पाणी असतं पण काही केस मध्ये कोमट पाणी असते तसंच नाचणीच आहे. तुम्हाला चांगली ताकद देणारी ही नाचणी असते.

ज्वारी जी आहे ती रुक्ष असते, बाजरी सुद्धा रुक्ष असते आणि नाचणी ही काही प्रमाणामध्ये स्निग्ध असते. ज्वारी जी असते ही पचायला हलकी असते, बाजरी पचायला थोडीशी जड असते आणि नाचणी ही पचायला हलकी असते. हे जे तीन पदार्थ आहेत त्याच्यामध्ये ज्वारी ही पचायला अतिशय हलकी असते पण ज्वारी रुक्ष असल्या कारणाने कॉ’न्स्टिपेशन क्रिएट करण्याची शक्यता ही जास्त असते, त्याचबरोबर बाजरी उष्ण असते, उष्ण असल्याने ती सुद्धा आपण योग्य वेळेला घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर नाचणी जी आहे ती पचायला जडही नाही हलकी आहे आणि ताकद सुद्धा वाढवते आणि कॉ’न्स्टिपेशन सुद्धा होत नाहीत.

ज्वारी ही पुरुषांसाठी अतिशय चांगली असते, पुरुषांची ताकद वाढवते आणि बाजरी ही स्त्रियांसाठी चांगली असते, स्त्रियांची ताकद वाढवते. जे शीत पदार्थ असतात ते पुरुषांसाठी कधीही चांगले असतात आणि उष्ण पदार्थ स्त्रियांसाठी चांगले असतात. पण अगदीच हा’निकारक असतात अस नाही, पण एक हेल्दी स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी हा नियम नक्कीच चांगल्या प्रकारे लाभतो.

हे वाचा:   चुकूनही या व्यक्तींनी आंबा खाण्याचा विचार करू नये; नाहीतर भोगावे लागतील गंभीर परिणाम.!

नाचणी जी आहे ही नाचणी स्त्रियांसाठी देखील चांगली असते आणि पुरुषांसाठी देखील चांगली असते. दोघांनाही नाचणी ताकद देण्याचे काम चांगल्या प्रकारे करते. पुढची गोष्ट अशी की कुठल्या प्रकारच्या आ’जारांमध्ये कुठल्या प्रकारची भाकरी आपल्याला वापरता येईल. ज्वारी ही कफ पित्तामुळे होणारे जे आजार असतात त्यांच्यामध्ये उपयोगी पडते आणि बाजरीची वात आणि कफ प्रकारचे जे आजार असतात त्यांच्यामध्ये उपयोगी पडते आणि नाचणीचा विचार कराल तर नाचणी पित्ताचे विकार कमी करते इतकेच नव्हे तर नाचणी ही रक्त शुद्ध करते.

आ’रोग्य जपण्यासाठी या तीनही धान्यांचा विशेष उपयोग होतो. ज्वारी असते ती मू त्र ज’नन आहे, हे रक्तामधून होते. रक्त ज्यावेळी किडनीमध्ये जात त्याच्यातून यु’रिन फिल्टर होऊन बाहेर निघते. म्हणजेच रक्ताला शुद्ध करण्याचे काम किडनी करते. ही प्रक्रिया अतिशय चांगली करण्याचं काम ही ज्वारी चांगल्या प्रकारे करते.

बाजरी ही उष्ण असते, ज्यावेळी वातावरण थंड असते, एखाद्या थंड प्रदेशात असाल, तिथे उष्ण स्वभावाची ही बाजरी काम करते, तसेच भूक वाढवणारा पदार्थ म्हणूनही बाजरीला खाल्ले जाते, म्हणजेच एखाद्या व्यक्तीला भूक लागत नसेल बाजरीचे सेवन अतिशय उपयुक्त ठरेल, याचा खूप चांगला फायदा आहे.

यानंतर आहे ती म्हणजे नाचणी, नाचणी तृप्त करते, पूर्वीच्या काळापासून तृप्त ढेकर असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे आपण एखाद जेवण घेतो, जो पर्यंत आपल्याला सॅटिसफॅक्शन वाटतं की आपण चांगलं जेवण सेवन केले तेव्हा आपल्याला समाधान होतं , त्याला म्हणतात तृप्त होऊन ढेकर देतो. अशी तृप्तता करण्याचं काम ही नाचणी करते.

शरीरातील सात जे धातू असतात त्यांचं समाधान करण्याचं काम ही नाचणी करते, सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं वजन न वाढवता तुमची ताकद वाढवण्यासाठी नाचणी खूप गरजेची आहे. या तिन्ही प्रकारच्या भाकऱ्या कोणकोणत्या काळामध्ये घ्याव्यात हे जाणून घेणे अतिशय गरजेचं असतं. ज्वारी ही तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेऊ शकता आणि शरद ऋतूमध्ये सुद्धा. हा जो काळ असतो म्हणजे शरद ऋतूमध्ये तुम्ही ज्वारीचा वापर करू शकता.

हे वाचा:   डोळ्यांच्या कोणत्याही समस्येसाठी हा रामबाण उपाय नक्की करा; ३ महिन्यात चष्मा काढून फेकाल.!

ज्वारी तुम्ही उन्हाळ्यामध्ये घेत असताना त्याच्यावरती तुप लावावे आणि जर तुम्ही शरद ऋतूमध्ये ज्वारी घेत असाल तर त्याच्यावर तुपाची गरज नाही. पण जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. बाजरीचे सेवन पावसाळ्यामध्ये करायचं आणि हिवाळ्यामध्ये करायचं. जेव्हा वातावरणात थंडावा असतो त्यावेळी बाजरी तुमच्या शरीरामध्ये उष्णता तयार करण्याचं काम चांगल्या प्रकारे करु शकते. त्यामुळे तुम्हाला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बाजरीचा वापर तुम्ही करू शकता.

नाचणीचा वापर हा पूर्ण वर्षभर करू शकता. तसेच नाचणीच्या भाकरीचे सेवन अगदी एक वर्षाच्या बाळापासून शंभर वर्षाच्या वृद्धापर्यंत सर्वच जण करू शकतात. कारण नाचणी ही पचायला हलकी आहे आणि ताकदवर देखील. या तिघांमध्ये श्रेष्ठ कोण असा कुठे उल्लेख नाहीये, प्रत्येकाचे आपापले फायदे आहेत, फक्त त्यांचा वेळ आणि प्रमाण तुम्ही कशा प्रकारे वापरता आहात याच्यावर अवलंबून आहे.

प्रत्येकवेळी जेवण घेताना कॉन्टिटी फिक्स कधीच करू नये. प्रत्येक वेळेला तुमची जेवढी भूक आहे तेवढाच आहार घ्या. कधी जास्त भूक लागते तर कधी कमी , जेव्हा जास्त लागते जास्त आहार घ्या,कमी असेल तर कमीच घ्या. ज्वारी- बाजरी -नाचणी तिघांचेही फा’यदे बघितले तुम्हाला जसे जमेल तितके व तसे सेवन करण्याचा प्रयत्न करावा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.