अंगावर शहारा आणणारा थरारक स्वामी अनुभव..ही सत्य घटना वाचून अंगावर काटा येईल..स्वामीशक्ती चा अनुभव घ्याल..

अध्यात्म

श्री दत्तयांचे अवतार श्री स्वामी समर्थ याच्या भक्ताची एक अविस्मरणीय अनुभवकथा आहे. स्वामी समर्थ हे आपल्या भक्तांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात याचा एक अनुभव आहे. हा अनुभव मिरज येथे स्वामीभक्त अनुप कुलकर्णी या दादांचा आहे ते बोलतात की 2014 वर्ष, मी जस्ट बीकॉम मध्ये प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी माझ्या बाबांना कॅ-न्सर झाला पण स्वामींच्या आशीर्वाद म्हणून ते त्यातून बाहेर पडले आणि तसेच लगेच 1 वर्ष होत नाही तोपर्यंत माझा बाबांना हृदविकाराचा झटका बसला,

त्यांना ताबडतोब 42 हजार रुपयेचे इंजेक्शन दिले गेले. यातुन ते बरे झाले पण त्यांना दहा पावलं पण नीट चालता येत नव्हतं त्यामुळे डॉ-क्टरांनी बाबांची ऍन्जिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला. ऍन्जिओग्राफीत समजले की 100% ब्लॉकेजेसच्या स-मस्या असल्याने, लगेच आम्ही केएलई बेळगाव येथे उपचारासाठी घेऊन जायचे ठरवले.

तेव्हा मी खूप लहान व माझ्या दोन बहिणी सुद्धा होत्या. त्यातच लोकांनी हॉस्पिटलचा खर्च खुप आहे अशी भीती घातली होती. मी वीस हजार रुपये घेऊन बेळगावला रेल्वेने निघालो आणि स्वामी तुम्ही पाठीशी असेल तर ऑपरेशन होऊ देऊ नका असे स्वामींना बोललो.

हे वाचा:   खुप पैसा मिळवायचा असेल तर सकाळी उठताच हा मंत्र 3 वेळा म्हणा; आयुष्यात धन संपत्तीची कमी भासणार नाही.!

हॉस्पिटलमध्ये डॉ-क्टर माधव दीक्षित म्हणून डॉ-क्टर होते त्यांची भेट झाली आणि ऑपरेशन करायचं ठरलं. त्यांनीही खर्च सांगितला आणि मी पैसे भरले आणि मला खूप भीती वाटत होती म्हणून तिथे भाऊजींना थांबवून मिरजला आलो. दुसऱ्या दिवशी बाबांच्या सर्जरीची सर्व तयारी झाली आणि बाबांना आज ऑपरेशनला घेतलं.

सर्व मशीन लावले आणि डॉ-क्टर अँजिओग्राफी केलेली सीडी पाहुन ऑपरेशन करणार नाही असा निर्णय घेतला. तेव्हा डॉक्टर म्हणाले माझ्या चाळीस वर्षांचा अनुभव सांगतोय या माणसाच ऑपरेशन सुरू केलं, तर माणूस जागेवर मरणार आहे असे सांगून डॉक्टरांनी नकार दिला.

नंतर भाऊजींचा फोन आला व त्यांनी सर्व प्रकार मला सांगितला त्यावर मी खुप दुःखी होऊन रडायला लागलो, स्वामींसमोर रडू लागलो. तुम्हीच केलाय का असे बोललो तेव्हाच स्वामींच्या फोटोवरून फुल पडलं. तेंव्हापासून एक 6 महिने बाबांनी औ-षध घेतलं त्यावर बाबांनी एकही कसली गोळी घेतली नाही व ते आता दोन किलोमीटर रोज चालतात आणि त्याना कसलाही थकवा जाणवत नाही.

हे वाचा:   गुरुवारी सकाळी कोणालाही देऊ नका या तीन वस्तू; अन्यथा स्वतःवर कायमचं दुर्भाग्य ओढवून घ्याल.!

तसेच रोज न चुकता स्वामी समर्थ महाराजांची पूजा आणि जप करतात. आता त्यांचे आरोग्य चांगले आणि निरोगी आहे. हा मला आलेला स्वामींचा खरा अनुभव आहे. आमच्या घरात आई बाबा दोघेही स्वामी सेवेकरी आहेत. ते खूप वर्षांपासून स्वामीभक्ती करतात. मी त्यावेळी लहान असल्याने माझे लक्ष कधी अशा गोष्टीत लागले नाही.

पण जेव्हा आमच्या कुटुंबावर असे मोठे संकट आले तेव्हा मी देखील स्वामीकडे आशेचा किरण म्हणून पाहू लागलो. आणि जेव्हा माझे बाबा या संकटातून सुखरूप बाहेर पडले तेव्हा मला स्वामींवर विश्वास पटला. एक गोष्ट मला कळली की जर आपले कर्म आणि नियत  योग्य आणि सत्य असेल तर स्वामी वर विश्वास असो नसो पण स्वामी नक्कीच अशा व्यक्तीच्या पाठीशी नक्की उभे असतात.