9 ऑगस्ट: पहिला श्रावण सोमवार; नंदीच्या कानात गुपचूप बोला हे दोन शब्द..आपली इच्छा ताबडतोब होईल पूर्ण..अद्भुत योग..

अध्यात्म

मित्रांनो ९ ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार आहे. प्रत्येक शिव भक्त या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात आणि असा हा दिवस आलेला आहे आणि या श्रावण सोमवार मध्ये आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण काही विशेष उपाय करू शकतो. मित्रांनो आज आपण जो उपाय पाहणार आहोत तो अतिशय साधा आणि सोपा आहे.

महादेवाचे जे वाहन आहे नंदी महाराज यांच्या कानामध्ये आपल्याला काही शब्द बोलायचे आहेत हे शब्द बोलल्यानंतर आपण आपली इच्छा त्यांना सांगायची आहे. जी आपल्या मनामध्ये आहे, जी आपली इच्छा आहे, जी आपली मनोकामना आहे ते आपण महाराज नंदी देवाला सांगायची आहे.

मित्रांनो नंदी हे शिव शंकराचं भोलानाथचे वाहन आहे आणि त्यांना सांगितलेली कोणतेही गोष्ट कोणत्याही प्रकारची इच्छा ते भोलेनाथपर्यंत सहज पोचवतात आणि आपली इच्छा पूर्ण होण्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाही. मित्रांनो श्रावण महिना अतिशय शुभ काळ असतो संपूर्ण ब्रम्हांडामध्ये आध्यत्मिक शक्ती एका उच्च स्थरावरती असते.

अनेक प्रकारचे योग या दिवशी जुळून आलेले आहेत त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे योग म्हणजे सर्वाथ सिद्धी योग. मित्रांनो सर्व प्रकारच्या सिद्धी योग प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांशा पूर्ण करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो.

हे वाचा:   पितृपक्षामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा.!

भोलेनाथाचे भक्त या दिवसाची अगदी आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात आणि म्हणून अशा या दिवशी आपण केलेली कोणतेही कार्य शत पटीने फळदायक ठरतात. त्याच जे फळ आपल्याला मिळत ते कित्येक पटीने वाढून मिळत आणि म्हणून त्या दिवशी आपण व्रत करावं उपवास ठेवावा.

त्यादिवशी आपण एखाद्या मंदिरामध्ये जाल किंवा आपल्या घरामध्ये जर महादेव असतील तर त्याची पूजा कराल मात्र एखाद्या अशा मंदिरात जा की ज्या ठिकाणी महादेवाच्या समोर त्याचे वाहन महाराज नंदी असतील त्या ठिकाणी गेल्या नंतर नंदीच्या कानामध्ये आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे.

त्या मंत्रास महामृत्युंजय मंत्र असे म्हणले जाते. मित्रांनो महामृत्युंजय मंत्र असा आहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय यमामृत्ता. मित्रांनो हा मंत्र आपण महाराज नंदीच्या कानात म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील जी इच्छा असेल, जी मनोकामना असेल, जी आपली सं क ट असतील, जी स म स्या असतील जे काही असेल ते आपण महाराज नंदीच्या कानामध्ये सांगायचे आहे.

हे वाचा:   देव दर्शनानंतर लोकं मंदिरात का बसतात.? ९९% लोकांना माहिती नाही याचे खरे कारण.!

मित्रांनो महामृत्युंजय मंत्राचा महिमा फार मोठा आहे या मंत्राच्या उचारानंतर जर आपण आपली इच्छा प्रकट केली तर ती इच्छा महादेवापर्यंत पोहचते आणि या मंत्राच्या उच्चार केल्यानंतर आणि इच्छा बोलून दाखवल्यानंतर आपण शिवलिं-गाची पूजा करावी, दूध अर्पण करा, खीर अर्पण करा, मध अर्पण करा, कोणत्याही प्रकारची वस्तू आपण शिवलिं-गाला अर्पण करू शकता.

महादेवांना या गोष्टी प्रसन्न करतील त्यानंतर आपण अगदी आत्मविश्वासाने जे काही कार्य असेल, जे नियमित कार्य असेल, आपले जे जीवन असेल ते आपण जगू लागाल आणि आपल्या ज्या काही स म स्या असतील त्या त्वरित दूर होतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.