आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची? मांसाहार करून स्वामींची पुजा करावी कि नाही? जाणून घ्या..

अध्यात्म

खूप जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी सेवा करावी की करू नये. मग मांसाहार केल्यावर स्वामी सेवा किंवा इतर देवतांच्या सेवा कराव्यात की नाही पण मांसाहार करायचं नाही म्हटल तरी अडथळा बनून मध्ये येतो. आपल्या सर्वांच्या मनात खूप साऱ्या प्रश्नाचं वादळ निर्माण होत जसे की आम्ही मांसाहार करतो मग स्वामी सेवा कशी करायची,

मी मांसाहार करत नाही पण घरचे करतात तर मी स्वामी सेवा करू शकतो की नाही, मांसाहार केल्या दिवशी सेवा करावी की नाही किंवा ती कशी करावी अश्या प्रकारचे खूप प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात. त्यामुळे असे खूप सारे प्रश्न मनात असताना म्हणून सेवेत लक्ष लागण थोड कठीणच असते त्यामुळे आपण आपल्या मनात चालत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर आज आपण पहाणार आहे.

आपल्या सगळ्यांना स्वामी सेवा करायची असते पण मांसाहार या शब्दांमुळे आपली बऱ्या पैकी मानसिकता नकारात्मक होते. आपल्या मनापासून वाटत असत की स्वामी सेवा करावी आणि दुसरी कडे आपण मांसाहार करतो हा अशुद्ध भाव आपल्या मनात येतो. पण जेव्हा आपण शुद्ध शाकाहारी अन्न घेतो त्यावेळी आपल्या मनात कुठल्याही शंका येत नाहीत पण तसचे जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण करतात तेव्हा तुम्ही मा-नसिक दृष्ट्या स्वतःला अयोग्य समजतात आणि त्यामुळे आपल्या देवतेची आपल्या स्वामींची सेवा करणे भक्ती करणे अयोग्यच असते.

हे वाचा:   3 झाडू आणि एक उपाय, महालक्ष्मीची होईल प्रचंड कृपा; आयुष्यभर पैशाची चिंताच भासणार नाही.!

जेव्हा घरात मांसाहार जेवण बनवलेले असते तेव्हा घरातील वातावर रोजच्या दिवसासारखा नसतो त्या दिवसात थोडासा बदल असतो जर तुम्ही लक्ष दिले तर ते तुम्हाला नक्की जाणवेल त्या दिवशी घरात अशांतता वाढते घरात वादही होतील म्हणून मांसाहार हा स्वामी सेवेतील अडथळा होऊ शकतो.

मग आता यावर उपाय काय करायचा तर जेव्हा तुम्ही मांसाहार अन्न ग्रहण केला असेल तेव्हाच स्वामी सेवा न केलेलीच बरी आणि तसेही स्वामी भक्त सेवा करणारही नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी आपला तो दिवस स्वामी सेवी विना वाया गेला असे समजावे कारण श्री गुरू चरित्र ग्रंथात लिहले आहे “ज्या दिवशी पुण्य घडले नाही तो दिवस गेला वाई, तया यमाशी करूना नाही करावे पुण्य तात्काळ”.

हे वाचा:   या एका शापामुळे महिला भोगतायत त्यांची मा'सिक पाळी ! बघा तो कोणता शाप होता..ज्यामुळे स्त्रियांना हे सोसावे लागते

या वाक्याचा अर्थ आहे ज्या दिवशी आपल्या हातून पुण्य घडणार नाही तो दिवस वाया गेला असे समजावे पण त्या यमाला नसते त्यामुळे तात्काळ पुण्य करावे लागते. मग या मांसाहारामुळे आपला तो एक दिवस वाया गेला एवढे मात्र नक्की आहे. आता हे सगळे आपल्या मनातील विचार झाले पण आपल्या मनालाच प्रश्न करायचा की मी स्वामींची सेवा करतो स्वामींना आवडत असेल का मी मांसाहार केलेला याच उत्तर तुम्ही स्वतःच शोधण्याचा प्रयत्न करा.

ही माहिती अनेक मध्यमाच्या आधारे एकत्रित केलेली आहे याचा कोणीही सं-बंध अंधश्रद्धेशी जोडू नये ही विनंती.  स्वामींचे प्रेम समजण्यासाठी मन नेहमी पूर्णपणे शांत ठेवावे जेव्हा आपले मन शांत असते तेव्हा ते खूप शक्तिशाली असते. अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू अवधूतचिंतन भक्तवात्सल्य भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ.