आजच्या बदलत्या काळात, केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे.पण चुकीचा आहार, खराब जीवनशैली ही केस गळतीचे मुख्य कारणे सांगितली जातात.परंतु कधीकधी फॅशन आणि स्टाईलच्या नादात देखील केस गळतीची समस्या निर्माण होते.याशिवाय आजच्या पिढीतील युवक सुरूवातील केस गळतीकडे दुर्लक्ष करतात, मग नंतर मात्र, जेंव्हा केस गळती जास्त होते, त्यावेळी केस गळती रोखण्यासाठी सर्व प्रकारच्या उपाय करीत असतात.
आपण आपले केस जितके नैसर्गिक ठेवता तितके चांगले आहे. पण स्टायलिश दिसण्यासाठी मुली अनेक प्रयोग केसांवर करतात. तसेच त्यामध्ये केस मऊ करणे, सरळ करणे, केराटीन ट्रीटमेंट इ. या केसांच्या विविध केल्या जाण्याच्या प्रयोगात, आपल्या केसांवर विविध रसायने वापरली जातात.
यामुळे हळूहळू केस निर्जीव आणि कोरडे होतात. याशिवाय केस गळतीचे सर्वसाधारपणे, 4 प्रमुख कारणे सांगितले जातात त्यामुळे आपल्याला या 4 सवयी टाळल्या पाहिजे. कारण यामुळे आपले केस झपाट्याने गळण्याची शक्यता असते, यामध्ये ही पहिली वाईट सवय आहे, ती म्हणजे आपले केस कधीच गरम पाण्याने धुवू नये.
कारण त्यामुळे तुमचे केस कमजोर होण्याची शक्यता असते. तसेच जर आपण गरम पाण्याने आंघोळ करताना, हे गरम पाणी थेट केसांवर येऊ टाकू नये. जर तुम्ही गरम पाण्याने आंघोळ केल्यास,तुमच्या केसातील नैसर्गिक तेल कमी होऊन, तुमचे केस कोरडे होतात आणि केस कोरडे झाल्यामुळे, त्याची गळती लवकर होत असते.
त्यामुळे शक्य असल्यास, केस धुताना, कमी उबदार पाण्याचा वापर करा. यामुळे केस गळणे टाळण्यासाठी मदत होईल. याशिवाय दुसरी वाईट सवय म्हणजे,खुप चिंता किंवा काळजी करणे.जर आपण एखाद्या विशिष्ट गोष्टींचा खूप विचार किंवा चिंता करीत असल्यास,आपले केस हलके होण्यास सुरुवात होते, मग परिणामी केस गळती होते.
कारण, जर तुमच्या आयुष्यात काही समस्या असेल, तर एकतर तुम्ही त्या समस्येचे निदान करू शकता, मग काळजी करण्याची गरज नसते पण ज्या गोष्टीचे तुम्ही निदान करू शकत नाही, त्याची तुम्ही काळजी करू नये, कारण त्यामुळे काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे आपल्याला नेहमी योगा आणि ध्यान केले पाहिजे.
जर त्या चिंतेला तुम्ही तुमच्या आयुष्यातून कमी करू शकत नसाल, तर कमीत कमी दिवसात एक वेळा तरी ध्यान केले पाहिजे. त्यामुळे केस गळणे कमी होईल. ही वाईट सवय लवकरात लवकर कमी करावी. तिसरी वाईट सवय म्हणजे, केसांना जास्त काळापर्यंत, स्वच्छ किंवा धुतले जात नाही.
ही सवय प्रामुख्याने मुलींमध्ये पाहायला मिळत असते, कारण मुली केस कोरडे राहण्यासाठी, 2 ते 4 आठवड्यातुन धुवत असतात. त्यामुळे केसांची वाढ होत नाही, त्यामुळे किमान मुलींनी आठवड्यातून एकदा किंवा 2 ते 3 वेळा केस धुतले पाहिजे. याशिवाय मुलांनी देखील रोज केस स्वच्छ आणि नीटनेटके ठेवले पाहिजे.
म्हणून, आठवड्यातून कमीतकमी दोन किंवा तीन वेळा केसांची साफसफाई नक्कीच केली पाहिजे. तसेच पुढील वाईट सवय म्हणजे, केस लवकर सुखवण्यासाठी हेअर ड्रायर उपयोग करणे. कारण जे हेअर ड्रायर खूप गरम हवा बाहेर फेकते आणि त्यामुळे तुमचे केस गळण्याची शक्यता असते. म्हणून, हेअर ड्रायर हे खूप धो-कादायक मानले जाते. याशिवाय हेअर ड्रायरने, आपले केस जास्त कोरडे होण्यास सुरुवात होते,त्यामुळे केस गळती होण्याची शक्यता असते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.