घरात लक्ष्मी कशी येते? या गोष्टी तुम्हाला श्रीमंत बनवतील ! आजच जाणून घ्या..

अध्यात्म

माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपण नेहमीच पूजा, व्रत, उपवास, उपासना करतो. त्यासाठी घरातील मातेची प्रतिमा नेहमी स्वछ पुसावी, शुक्रवारी विधिवत पूजा करा. तसेच घरातील धूळ, कोळ्यांची जा ळी काढून टाका. घरी नेहमी माता लक्ष्मीचा वास रहावा यासाठी आपण मातेचा जप करावा, माता महालक्ष्मी चा मंत्र जप करा.

त्यामुळे तुमचं जीवन समृद्ध होईल, तुमच्या जीवनात आनंद, बरकत येईल. धनाचे मार्ग मोकळे होतील. दररोज देवघरात दिवा लावतो तो कापसाचा न लावता लाल रंगाच्या दोऱ्याचा वापर करावा. कारण देवी लक्ष्मीला लाल रंग अतिप्रिय आहे. यामुळे ते लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते.

कोणी कितीही जवळची व प्रिय व्यक्ती असेल तरीही बुधवारी कोणालाही उसने पैसे देऊ नये किंवा कर्जही देऊ नये. कारण बुधवारी दिलेले पैसे बुडतात ते परत मिळत नाहीत. आपल्याला जर कोणाकडून कर्ज घ्यायचे असेल तर कर्जाची रक्कम घेऊन त्यातून शंभर किंवा पन्नास रुपये लगेचच कर्जाची परतफेड म्हणून परत करावे. यामुळे ते कर्ज लवकर फिटते.

आवळ्याच्या झाडांमध्ये गायीच्या शेणात, कमळामध्ये तसेच पांढऱ्या वस्त्रांमध्ये देवी लक्ष्मी सदैव वास करते. ज्या घरांमध्ये देवादीदेव महादेवांचे पूजन केले जाते, तसेच ददेव-देवता, साधुसंत, गुरु, महात्मे यांचा मान सन्मान केला जातो अशा घरांमध्ये देवी लक्ष्मी चिरंतन वास करते.

हे वाचा:   अंघोळीच्या पाण्यात टाका फक्त ही एक वस्तू; आयुष्यभर पैसे, संपत्तीची कमी भासणार नाही.!

संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही घर झाडू नये. कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते म्हणून संध्याकाळी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवावा. तसेच शुक्रवार लक्ष्मीचा दिवस आहे म्हणून जर शुक्रवारी एखादी सवाष्ण स्त्री आपल्या घरी आली तर लक्ष्मीस्वरूप समजून तिला काहीतरी खायला द्यावे किंवा जेवण करायला सांगावे आणि परत कुंकू लावून तिला नमस्कार करावा.

आपले घर नेहमी स्वच्छ सुंदर व टापटीप असावे. ज्या व्यक्तींना बोटांना थुंकी लावून पैसे मोजण्याची सवय असते परंतु यामुळे देवी लक्ष्मीचा अपमान होतो आणि देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. शनिवारी गहू-बाजरी असे दळून आणताना यामध्ये एक मूठभर काळे वाटाणे टाकून ते दळून आणावेत.

यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. काही घरांमध्ये दळण करताना धान्याचे दाणे खाली पडतात. तांदूळ वगैरे धुताना ते पाण्याबरोबर वाहून जातात. हा अन्नधान्याचा अपमान समजला जातो. म्हणून ज्या घरात अन्नधान्याचा मान ठेवला जात नाही ते कचऱ्यात टाकले जाते त्याच ठिकाणी देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही.

ज्या घरातील स्वयपाक झाला की सर्वात आधी गायीला नैवेद्य देतात आणि गाईची पूजा करतात त्या घरावर देवी लक्ष्मीची कृपा कायम राहते. तसेच आपण जर बँकेत पैसे जमा करायला गेलो तर मनातल्या मनात लक्ष्मीच्या मंत्राचा जप करीत राहावे. यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पैसे जमा करण्याची संधी मिळते आणि आपला बँक बॅलन्स वाढत राहतो.

हे वाचा:   हाताचा अंगठा उघडेल तुमचे सर्व रहस्य; अंगठ्याच्या मदतीने तुम्हीही ओळखू शकता तुमचे भविष्य.!

शंख देवघरात ठेवायचा असेल तर त्यात पाणी भरून ठेवावे आणि तिजोरीत ठेवायचा असेल तर त्यात हळद टाकून पिवळे केलेले तांदूळ भरून ठेवावे. रिकामा शंख कधीही ठेवू नये. बुधवारी जर आपल्या समोर एखादा तृतीयपंथी व्यक्ती आली तर त्यांनी न मागताही आपल्या क्षमतेप्रमाणे त्यांना काही पैसे देऊन टाकावेत आणि त्यांच्याकडून एक नाणे मागून घ्यावे.

हे नाणे नेहमी आपल्या पर्स पाकीट किंवा तिजोरीत राहू द्यावे. त्यामुळे आपल्या घरात पैशांना बरकत येते. अशा प्रकारे तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हे छोटे छोटे परिणामकारक उपाय नक्की करा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा बेस्ट मराठीचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे बेस्ट मराठी फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.