आपल्या हिंदू ध-र्मात तुळशीचे फार महत्व आहे प्रत्येक हिंदूंच्या दारापुढे तुळस ही असतेच. ज्यांच्या दारात तुळस असते अश्या घरावर सर्व देवी देवतांची कृपा नेहमी राहते तुळशीचे फक्त दर्शन घेतल्याने आपली सर्व पापे जळून जातात. आपल्या विविध धार्मिक ग्रंथात तुळशीचे महात्म्य सांगितले आहे तुळस मातेने स्वतः असे सांगितले आहे की जे व्यक्ती आपल्या घरात मला लावून माझी श्रद्धा भावनेने पूजा करतील त्यांना जीवनात कधीही कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही.
आणि ज्या घरात मी असते अश्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक व वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. म्हणून प्रत्येकाच्या दारात तुळस असणे फार आवश्यक आहे परंतु तुळस लावताना आपल्याला काही गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल नाहीतर तुळस मातेचा आशीर्वाद मिळण्याऐवजी तुळशी मातेच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.
चला तर जाणून घेऊ की तुळस लावताना कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. तुळस लावताना नेहमी चांगलीच माती वापरावी खराब झालेल्या मातीत तुळस कधीही लावू नये यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते आणि तुळस मातेच्या क्रोधाचा सामना आपल्याला करावा लागतो. जर दारात लावलेली तुळस वाळली असेल तर ती लगेच काढून विसर्जन करावी वाळलेली तुळस दारात लावल्याने अकाल मृत्यूचा धो का असतो व आपल्या घरातील सुख समृद्धी निघून जाते.
जेथे तुळस वाळलेली असते तिथे देवी लक्ष्मी कधीही निवास करत नाही तुळस जर वाळली तर समजून जावे की आपल्या घरात नकारात्मक शक्तीने प्रवेश केलेला आहे आणि लवकरच काही तरी अघटित घटना घडणार आहे. शास्त्रात असे म्हटले गेले आहे की दारात वाळलेली तुळस लावणे म्हणजे साक्षात तुळस मातेचा अपमान करण्यासारखे आहे.
अश्या घरावर तुळस माता नेहमी क्रोधीत राहते. मासिक पाळीत कोणत्याही झाडा झुडपांना पाणी टाकू नये विशेषतः तुळशीला मासिक धर्मात पाणी अर्पण करूच नये नाहीतर तुळस कोरडी होते आणि घरातील सुख शांतता निघून जाते. तुळशीच्या कुंडीची नेहमी स्वच्छता करत राहावे तुळशीच्या पानांना इथे तिथे कुठेही फेकू नये ती पाने पाण्यात किंवा मातीत विसर्जत करावी.
तुळशीच्या रोपात रासायनिक खत कधीही टाकू नये त्यामध्ये कंपोस्ट खताचाच वापर करावा. तुळशीला पाणी अर्पण करताना कधीही पायात चप्पल असू नये तसेच आपण जे पाणी तुळशीला अर्पण करत आहोत ते पाणी पायावर पाडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी यामुळे आपल्याला पाप लागते व आपली धन हा नी होते.
तुळस मातेचे नियमित दर्शन केल्यास आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते तसेच आपल्यावर व आपल्या कुटुंबावर सकारात्मक ऊर्जा बनलेली राहते. तुळशीच्या पानांना नखे लावून पाने तोडू नयेत यामुळे आपल्या आ-रोग्यावर दुष्परिणाम जाणवतो व घरात आ-जारपण प्रवेश करते. तुळशीचे रोप आपल्या घराच्या अंगणात अगदी दारासमोर लावावे तुळशीचे रोप कधी वाईट हेतूने लावू नये व तुळशीचे रोपे एका पेक्षा अधिक आलेली असतील तर ती शेजाऱ्यांना वाटून द्यावीत.
एक पेक्षा जास्त तुळशीचे रोपे दारात येणे म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचे घरात येण्यासारखे आहे यामुळे आपल्या घरात भरभराट उठेल. तुळशीच्या आसपास कपडे वाळत टाकू नये तसेच वृंदावनाजवळ चपला काढू नयेत. मा’सिक ध-र्मात स्रिया तुळशीपासून दूरच राहावेत. व्यसनी व्यक्तीने तसेच मांसाहारी व म ध्य पा न करण्याऱ्या व्यक्तिंनी तुळशी पासून दूरच राहावेत.
स्त्री पुरुषांनी शा-रीरिक सं बंध केलेले असतील तर स्नान केल्याशिवाय तुळशीच्या आसपासही जाऊ नये यामुळे तुळशीवर अपवित्र छाया पडते व घरात गरिबी आणि दारिद्य्र येते. तुळशीमध्ये कधीही शिवलिं-ग आणि गणपतीची मूर्ती ठेऊ नये यामुळे घरात काहींना काही अडीअडचणी येत राहतात. तुळस मातेला नियमितपणे दिवा लावत राहिल्यास आपल्याला कितीतरी अधिक पटीने पुण्य फळाची प्राप्ती होते व आपले घर सुख, समृद्धी व समाधानाने भरून जाते.