बेलपत्र तो’डण्याचे नियम व महादेवाला बेलपत्र वाहण्याचे नियम..९९ टक्के लोक यात चुका करतात..जाणून घ्या

अध्यात्म

पवित्र श्रावण महिना चालू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यात आपण प्रत्येकजण शिवशंकराची मनोभावे पूजा करतो त्यांना प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठीच शिवलिं’गावर जल व बेलपत्र, रुईची फुले,धोत्रा, भांग, कापूर, दूध, अक्षद, चंदन, भस्म, रुद्राक्ष असे अनेक प्रकारची सामग्री आपण शिवलिं’गावर अर्पण करत असतो.

मात्र भगवान शिवशंकरांना या सर्वाधिक सामग्री पैकी सर्वात प्रिय आहेत ती म्हणजे बेलपत्र या पाठीमागचे कारण असे आहे की समुद्र मंथनाच्या दरम्यान जेव्हा हलाहल वि ष बाहेर पडले हे वि ष भगवान शिवशंकरांनी सृष्टीला वाचवण्यासाठी स्वतः ते वि ष प्राशन केले. त्यामुळे त्यांच्या मस्तकाची प्रचंड आ ग होऊ लागली आणि हि आ ग शांत करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांच्या मस्तकावर ही बेलपत्र ठेवली सोबतच जलधार अर्पण केले.

त्यामुळे भगवान शिवशंकराचे मस्तक शीतल व थंड झाले आणि ते प्रसन्न झाले. अगदी त्याच दिवसापासून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी बेलाची पाने त्यांना अर्पण करण्याची प्रथा पडलेली आहे. प्रत्येक भाविकांने या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिलिं’गावर बेलाची पाने नक्की वाहावी मात्र ही पाने वाहताना काही नियमांचा पालन मात्र आवश्य करा.

कारण बेलपत्राच महात्म्य जितक मोठ आहे त्याच प्रमाणे पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी योग्य प्रकारे ही बेलपत्र शिवलिं’गावर अर्पण करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. पहिला नियम चथुर्ती,अष्टमी,नवमी,चतुर्दशी आणि अमावस्या या तिथींना आणि सोबतच संक्रांतच्या वेळी व सोमवारच्या दिवशी बेलपत्र चुकूनही तो डू नयेत.

हे वाचा:   133 वर्षानंतर बनत आहे महासंयोग..आज गटारी अमावस्या; या राशींचे भाग्य चमकणार पुढचे 12 वर्षं राजयोग !

जर तुम्ही बेलाच्या झाडावरून ही पाने तो’डणार असाल तर लक्षात ठेवा वरील तिथींना सोबतच संक्रांत असेल त्यावेळी आणि सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडण्यास हिंदू ध र्म शास्त्रानी मनाई केली आहे. दुसरी गोष्ट ही बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडास कोणत्याही प्रकारचा नुकसान पोहचणार नाही याची काळजी घ्यायला हवी.

अनेक जण फांद्यांच्या फांद्या तो’डून आणतात अस न करता एक एक बेलाचे पान मनोभावे तोडायचे आहे आणि ते तोडताना “ॐ नमः शिवाय” या महामंत्राचा सातत्याने जप करायचा आहे. आणि त्यापूर्वी बेलपत्र तोडण्यापूवी त्या बेलाच्या झाडास मनोमन नमस्कार करायचा आहे. जर तुमच्या कडे बेलपत्र उपलब्ध नसेल तर बेलपत्राचा आपण पुनर्वापर करू शकतो.

अगदी दुसऱ्या व्यक्तीने शिवलिं’गावर वाहिलेली बेलपत्र स्वच्छ धुवून त्याचा सुद्धा वापर आपण करू शकतो हे स्कंदपुरणात मानले जाते. शिलिंगावर बेलपत्र चढवताना ते नेहमी उलटे अर्पण करावे लागते म्हणजेच त्या पानाचा जो मऊ भाग आहे तो आपण शिलिं’गावर अर्पण करायचा आहे.

थोडक्यात हे बेलपत्र पालथे अर्पण करावे. बेलपत्र तो’डताना त्या बेलपत्राला चक्र तर नाही किंवा वज्राचा तर निशाण नाही ना याची सुद्धा पुरेपूर काळजी घ्या. अनेक बेलपत्र शक्यतो तीन पानाचे असतात मात्र जर तुमच्या भाग्यात किंवा नशिबाने जर तुम्हाला 5, 7, 9 किंवा 11 पानाचे बेलपत्र जर मिळाल तर तुम्ही भाग्यवान आहेत आणि अशी बेलपत्र आपण महादेवांना नक्की अर्पण करा.

हे वाचा:   गरीब सुद्धा राजा बनू शकतो; रोज सकाळी एक चपाती चा करा हा गुप्त उपाय, पैसे धावत तुमच्याकडे येईल.!

जर कोणत्याही कारणास्तव तुमच्या कडे बेलपत्र नसेल तर चांदीचे बेलपत्र सुद्धा तुम्ही शिवलिं’गावर अर्पण करू शकता आणि त्याचा पुनर्वापर सुद्धा करू शकतात. जर बेलपत्र उपलब्ध होतच नसेल तर केवळ बेलाच्या झाडाच दर्शन घ्याव मनोभावे प्रणाम करावा त्याने सुद्धा सर्व पाप नष्ट होतात आणि महादेवाची कृपा आपल्यावर होते.

अनेक लोकांना सवय असते दुसऱ्या लोकांनी अर्पण केलेली जे बेलपत्र आहेत त्याला नाव ठेवतात अश्या प्रकारची चूक आपण करू नका भोलेनाथ आपल्या भक्तांवर आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी तत्पर आहेत. आणि अश्या प्रकारची चूक जी व्यक्ती करते त्या व्यक्तीचा विनाश हा अगदी ठरलेला असतो आणि म्हणून महादेवाच्या भक्तांची आपण उपेक्षा कधीच करू नका.

बेलपत्र वाहताना ते फाटलेले तर नाही ना ते सुद्धा नक्की पहा तर बेपत्राच्या या नियमा सं-बंधी पालन अवश्य करा महादेवाची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर राहील.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.