देवघर म्हणजे अशी जागा जी घरातील पावित्र्य राखण्यात मदत करते. घरात देवघराला अत्यंत महत्त्व आहे, कारण जिथे पूजा केल्याने आपल्या मनाला शांती प्राप्ती होते. तसेच शरीरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. ही जागा अशी असते, जिथे आपण मनमोकळेपणाने देवाशी संवाद साधतो, आपल्या चुका स्वीकारतो आणि त्याची माफी देखील मागतो.
परंतू हे सर्व करताना त्याचा शत- प्रतिशत लाभ व्हावा यासाठी योग्य ठिकाणी देवघर असणे अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय,ज्या पूजाघरात दोन संयुक्त मूर्ती असतात,त्या घरात कधीच कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होत नाही. याशिवाय ज्या घरात या सं यु क्त मूर्ती असतात, त्या ठिकाणी राजयोग येतो.
तसेच या मूर्तीची नेहमीच पुजा केल्यास, आपल्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात. याशिवाय आपल्या जीवनातील अडी-अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला या मूर्तीबरोबर आणि इतर देवतांचे पूजन केले पाहिजे. यामध्ये जर आपण आपल्या घरात राधा-कृष्णची मूर्ती किंवा फोटो ठेवला पाहिजे.
ही जोडीची मूर्ती आपण आपल्या देवघरात किंवा हॉलमध्ये अगदी बेडरूममध्ये ठेवल्यास, शुभ मानले जाते. कारण यामुळे आपल्या घरात भांडण-तंटा कमी प्रमाणात होण्यास मदत होते. घरातल्या कुटुंबात एकमेकांबद्दल प्रेमाची भावना निर्माण होण्यास सुरुवात होते. याचबरोबर, आपल्या घरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटोची पूजा केली पाहिजे.
यासह आपण विष्णू-लक्ष्मी यांच्या जोडीच्या मूर्तीचे किंवा फोटोचे पूजन केले पाहिजे. कारण वास्तू शास्त्रानुसार ज्या घरात भगवान विष्णूचा निवास असतो, त्याच ठिकाणी माता लक्ष्मीचा शुभाशीर्वाद असतो. लक्ष्मी-विष्णू फोटो हा बसलेला असला पाहिजे. याशिवाय लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती असलेला फोटो असल्यास, घरात काम-धंदा वाढण्याची शक्यता असते.
तसेच दुसरी मूर्ती म्हणजे, भगवान हनुमानाची मूर्ती देवघरात ठेवल्याने घरात नुकसान होत नाही. कारण हनुमान महाबली शक्तिशाली असल्याने, तसेच हनुमानाचा फोटो बरोबर आपण श्री रामाची मूर्ती किंवा फोटो पूजा केल्यास ,या दोन्हीच्या पूजेचे फळ मिळते. या शिवाय घरामध्ये श्री रामाच्या दरबाराचा फोटो ठेवला पाहिजे.
याशिवाय ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या सं यु क्त मूर्ती किंवा फोटोच्या पूजनाने, आपल्या घरातील मोठ्यात मोठी संकटे नष्ट होण्यास मदत होते. आपल्या देवघरात ही गणपतीची मूर्ती एकच असली पाहिजे, याशिवाय शिवलिं-गची मूर्ती ही 1, 3, 5 इतक्या असल्या पाहिजे. कारण देवघरात 2 शिवलिं-ग पूजन अत्यंत अशुभ मानले जाते. तसेच या शिवलिं-गाचा आकार हा आपल्या अंगठ्यापेक्षा लहान असावा.
याशिवाय आपल्या देवघरात भगवान हनुमानाची मूर्ती बसलेली असली पाहिजे, तसेच हनुमान हे बालब्रह्मचारी असल्याने, त्याचा फोटो चुकूनही आपल्या बेडरूममध्ये ठेवू नये. यांची मूर्ती देवळातच असली पाहिजे.पण राधा कृष्णाची मूर्ती आपण आपल्या बेडरूममध्ये ठेवू शकतो, सकाळी उठल्यानंतर जोडीचा फोटो पाहिल्यास दिवस आनंदात जाण्यास मदत होते. तसेच दुर्गामातेची क्रोधीत स्वरूपात मुर्ती घरात कधीच नसावी.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.