कपाळावर असे कुंकू कधीच लावू नका नाहीतर नवऱ्यासोबत वाईट घडू शकते..जाणून घ्या

अध्यात्म

मित्रांनो, हिंदू ध-र्मात कुंकूला खूप महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्यात कुंकूचा वापर केला जातो. विवाहित महिलेच्या आयुष्यातील कुंकूचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिने कपाळावर लावलेले कूंकू म्हणजे तिच्या सौभाग्याची ओळख, सौभाग्याचं देणं मानले जाते. सौभाग्याचे म्हणजेच पतीचे आयुष्य भरपूर राहावे, यासाठी महिला कपाळावर कुंकू लावतात.

सवासण्या स्त्रीने भांगात कुंकू भरणे खुप शुभ असते परंतु जेव्हा आपण कुंकू भांगात भरतो तेव्हा मोकळ्यात सर्वांनसमोर कधीही भांग भरू नये. आपल्या कुंकाची डबी कधीही इतरांन बरोबर शेअर करू नये आपण मेकअपचे वस्तू आपली बहीण, वहिनी यांच्या बरोबर शेअर करतो त्याच प्रमाणे कुंकू ही शेअर करतो व हे चुकीचे आहे.

आपण भांग भरताना कोरडे कुंकू भरणे खूप शुभ असते जर कोरडा कुंकू भरताना नाकावर किंवा चेऱ्यावर थोडेसे कुंकू जर पडले तर ते खूप शुभ असते कारण नाकावर कुंकू पडण्याचे अर्थ तुमच्या पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुमच्या हातून किंवा इतर कोणाच्या हातून कुंकाची डबी खाली पडली असेल तर आधी कुंकाला नमस्कार करून थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर लावावे.

हे वाचा:   नवरात्रीचे 9 दिवस घरात करा अशाप्रकारे कलश स्थापना; महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख मिळेल.!

मग ते कुंकू डबीत भरावा आणि बाकीचे खराब झालेल कुंकू कोणत्याही झाडाच्या खाली टाकावा जणे करून त्या कुंकावर कोणाचे पाय पडणार नाही. सकाळी स्नान झाल्यावरच भांगात कुंकू भरावा तुम्ही दिवसभरात कितीही वेळा भांग भरू शकता पण दिवसातून कमीत कमी दोन वेळेस तर भांग भरावा.

काही स्त्रीला एका साईडला तिरपे कुंकू लावण्याची सवय असते पण असे म्हणतात की जी स्त्री एका बाजूला तिरपा भांग भरते तिचा पती तिच्या पासून बाजूला होऊन जातो. जी स्त्री भांग भरते आणि केसाच्या आत झापुन ठेवते तिचा पती समाजापासून अलिप्त होतो. म्हणून सिंदूर लावताना नाकाच्या शेंड्यापासून सरळ रेषेत भांग भरावा व ते इतरांना दिसेल अश्या पद्धतीने लावले पाहिजे.

जर तुम्ही कोरडा कुंकू लावत असाल तर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटानी भांग भरावा. भांग भरलेली महिला हे तिच्या विवाहित असल्याचे प्रमाण आहे कुंकू हे देवी देवतांना अर्पण केले जाते व स्त्रीला ही भांग भरण्यासाठी दिले जाते म्हणजेच स्त्रीला देवीचा मान दिला जातो.

हे वाचा:   वे'श्येचे हे दोन गुण अंगीकारून तुम्ही बनू शकता करोडपती...बघा रहस्य जाणून घ्या..

सिंदूर लावणे हे आपल्या सौंदर्यात ही भर टाकते आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हे शुभ असते. काही महिलांना सिंदूर लावणे आवडत नाही रोज नाही तर आढवड्यातून दोन दिवस तर भांग अवश्य भरावा.

कुंकू लावल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि स्त्रीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच कुंकू लावलेल्या स्त्रीला आ-रोग्याविषयी लाभ होतात. कुंकू लावल्याने मेंदूला शितलता मिळते आणि डोके शांत राहते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.