आपल्या घराचा आ त्मा हा स्वयंपाक घर असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ स्वयंपाक घरात जात असतो. जर स्वयंपाक घर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तीच ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सदस्यांना मिळते स्वयंपाक घर नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्न धान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव आपल्या स्वयंपाक घरात नसू नये.
आपल्या घरात बरकत राहावी देवी अन्नपूर्णाचे वास्तव्य आपल्या घरात राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटते. आज आपण पहाणार आहोत देवी लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा कायम वास्तव्य राहण्यासाठी व घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाक घरातील अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीही संपवू देऊ नयेत.
आपल्या आहारात सर्वात महत्वाचा पदार्थ मीठ आहे मीठ हे प्रत्येक घरात उपलब्ध असते परंतु कधीतरी थोडे मीठ शिल्लक राहते तेव्हा आपण विचार करतो आपण हे मीठ उद्या अनु व संपूर्ण मीठ संपवतो परंतु घरातील मीठ कधीही संपू देऊ नये. घरातील मीठ संपणे हे नकारात्मक उर्जेचे लक्षण ठरते यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामूळे वास्तुदोष सुद्धा होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो.
तसेच घरात पैश्या सं-बंधीत समस्या सुद्धा निर्माण होतात. हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे ती अन्नात चव व सुंदर्य देखील वाढवते हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसेच जेवणात सुद्धा केला जातो प्रत्येक शुभ कार्यात हळदीचा वापर नक्कीच होतो. घरात हळद संपणे म्हणजे गुरू ग्रहाचा दोष लागतो म्हणून घरात हळद कधी संपू देऊ नये.
घरात आधीच जास्त हळद आणून ठेवावी किंवा हळद संपण्या आधी दुसरी हळद आणून ठेवावी घरात पूर्णपणे हळद संपली तर मुलांकडे व त्यांच्या अभ्यासाकडे पूर्णपणे लक्ष देता येत नाही आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही कमी पडू देवू नका. पीठ एक अशी वस्तू आहे ती सर्वांसाठी महत्वाची ठरते म्हणून पीठ संपायच्या आधी आपल्या घरात पीठ आणून ठेवावे.
आपण ज्या भांड्यात पीठ ठेवतो त्या भांड्यात पीठ संपल्यावर थोडे पीठ शिल्लक राहुद्यायचे आणि त्यात लवकर पीठ भरा जेव्हा घरात पीठ संपते तेव्हा तुमच्या मानसन्मानाबद्दल हा नी निर्माण होऊ शकते. तांदळाचा उपयोग अन्न धान्यामध्ये करतातच पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो घरात तांदुळ संपल्यावर शुक्र ग्रहाचा दोष लागतो शुक्र ग्रह भौतिक सुख, संपत्तीसाठी महत्वाचा मानला जातो.
म्हणून घरात तांदूळ संपल्यामुळे पैश्या संबंधित अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून घरात तांदूळ कधीच संपू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळे पैसा टिकून राहतो. स्वयंपाक घरात वरील काही वस्तू नेहमी भरलेल्या असुद्या जेणे करून तुमच्या घरामध्ये कधीच अडचन निर्माण होणार नाही. आता आपल्या लक्षात आलेच असेल की स्वयंपाक घरातली अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्या कधीच संपू देऊ नये या गोष्टी कडे लक्ष द्या व या गोष्टी संपण्यापूर्वीच घरात आणून ठेवा.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.