घरासमोर ही झाडे अजिबात असू नयेत..घरात अचानक विपरीत घटना घडतात, पैसा टिकत नाही..आजच जाणून घ्या

अध्यात्म

आपल्या घरी सतत वाद, चिडचिड, कलह होत असतील, अचानक दुर्घटना घडत असतील व तसेच कितीही प्रयत्न करून देखील आपल्याला यश मिळत नसेल, नोकरी मिळत नसेल तर हा उपाय नक्की करा. उपाय म्हणजेच आपल्या घराभोवती जर ही झाडे असतील तर ती त्वरित हटवा, कारण त्यांचा परिणाम आपल्या घरावरती, घराच्या सुखावरती होत असतो तसेच आपल्या होणाऱ्या दुर्घटना यामुळे होत असतात.

आपल्या घरासमोर जर ही काही झाडे असतील तर तुमचं घर बरबाद होईल, घरात येणारा पैसा टिकून राहणार नाही, कितीही पैसे आले तरी ते वायफळ खर्च होतील. तसेच कोणती झाडे लावणे शुभ ठरेल हे देखील महत्वाचे आहे, त्याची देखील आपल्याला माहिती हवी. सर्वांत पहिले म्हणजे घरासमोर काटेरी झाडे लावणे खुप अशुभ मानले जाते.

याला 2 अपवाद आहेत .त्यामध्ये प्रामुख्याने गुलाब आणि कोरफड याचा समावेश होतो या झाडांनी घरावरती काही परिणाम होत नाहीत. पण इतर काटेरी झाडे काही लोक घरात सजावटीसाठी ठेवतात. त्याने घरात कलह निर्माण होतो आणि दुसरे झाड आहे ते पपईचे झाड. हे झाड जरी दिसायला चांगले दिसत असले तरी हे घरासमोर असल्यास घरात धन हा-नी होते.

हे वाचा:   मोरपंख “या” जागी ठेवल्याने लोक बनत आहेत करोडपती; हे आहेत मोरपंखाचे चमत्कारी उपाय.!

यानंतर देवाची वनस्पती म्हणून प्रचलित असलेले झाड म्हणजे रुईचे झाड ही घरासमोर असू नये आणि असेल तर ते काढुन टाका. तसेच पिंपळाचे आणि वडाचे झाड सुध्दा; दोन्ही झाडे वातावरण निर्मितीसाठी जरी आवश्यक किंवा फायदेशीर असली तरी, ही झाडे आपल्या घरासमोर असल्याने घरात खुप अडचणी येतात.

पण ही झाडे उपटून टाकण्यापूर्वी 2 नवीन रोपटी आधी लावा मग 2 झाडे काढून टाका. त्यामुले 2 झाडे उपटून टाकल्याचे दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाहीत. पातक लागत नाही. कोणत्याही प्रकारचा घराच्या भिंतीवर चढणारा वेल असल्यास तो काढून टाका. त्याने खूप सारे अनिष्ठ परिणाम आपल्या कुटुंबाला होऊ शकतात.

तसेच या अशुभ वनस्पती बरोबर काही शुभ वनस्पती पण आहेत की ज्या घरासमोर लावल्यास घरात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते. यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट हे सर्वात महत्त्वाचे शुभ झाड किंवा वनस्पती घरासाठी मानली जाते. याला पैशाचे झाड असेही म्हणतात. शमीचे झाड देखील घरासमोर चांगले मानले जाते.

हे वाचा:   फक्त एक नारळ गपचूप इथे ठेवा; कोणत्याही कामात नक्की मिळेल यश.!

तसेच तुळस ,कडीलिंब ,बेलाचे झाड , नारळ ,अशोक आणि चंदन , रक्तचंदन, नागकेशर आणि चाफा ही झाडे किंवा वनस्पती लावल्याने घरात पैशाचा पाऊस पडतो. तुम्हाला आवडणाऱ्या झाडांची लागवड तुम्ही अवश्य करावी पण जवळपास तुम्ही या झाडांची लागवड करू नका, दूर कुठंतरी, शेतात अशी झाडे लावा व जतन करा.

पर्यावरण प्रेमी व्यक्तींनी झाडे लावावीत पण घरातील परिस्थिती, सुख, समृद्धीचा विचार करता निसर्गातील विविध ठिकाणी, निर्मनुष्य ठिकाणी तुम्ही या घराजवळ न लावता येणाऱ्या झाडांची मशागत करू शकता. अशा प्रकारे तुम्ही वृक्षप्रेम व्यक्त करू शकता, आपलं शास्त्र विज्ञान आहे अंधश्रद्धा कोणतीही नाही.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.