घरची लक्ष्मी ही घरातील महिला असते, घराचं घरपण ती जपत असते, घरातील दोष, लाभ, शुभ सर्वकाही तीच पाहत असते. त्यामुळे घराची जबाबदारी ही खास करून महिलांवरती असते, जी प्रत्येक महिला जवळपास उत्तम सांभाळते पण हे सर्व करत असताना तुम्ही नक्कीच या गोष्टींचं गां भी र्य लक्षात घ्यायला हवं,
तुमच्या घरातील या गोष्टींकडे तुमचं लक्ष असायलाच हवे, कारण या वस्तू फार महत्वाच्या असतात. त्यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा, आनंद निघून जाऊ शकतो, त्यासाठी या गोष्टी नक्कीच ध्यानात ठेवा. तुमच्या घरी यामुळे घडणाऱ्या वाईट घटनांच्या मागे या गोष्टी कारणीभूत ठरतात.
महिला घरची प्रमुख असते, सर्वांची काळजी घेते, सर्वांना प्रेमाने वागवते हा गुण देवाने महिलांना अधिक दिला आहे, त्यामुळे तुम्ही हा गुण वापरायचा आहे, म्हणजेच घरी चिडचिड, भांडण करायचे नाहीये, सतत रागावणे यामुळे घरात नकारात्मकता वाढते व घरातील सकारात्मक ऊर्जा संपते, तसेच घरातील माता लक्ष्मी निघून जाते.
यामुळे घरात दारिद्र्य, गरीबी येते ज्यामुळे तुम्ही कंगाल होता. प्रत्येक कामात अपयश येते. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही रोज नियमाने जेवण बनवून झाल्यावर जेवणापूर्वी त्यातील काही अन्न प्रसाद म्हणून देवासाठी काढावे, असे रोज करावे ज्यामुळे तुमच्या परिवारात प्रेम वाढते, आपुलकी वाढते, एकमेकांच्या प्रति आदरभाव वाढतो व ईश्वर सुद्धा प्रसन्न राहतो. त्यामुळे या गोष्टी जरूर करत रहा.
हा उपाय अतिशय सोपा आहे व त्याचे परिणाम लाभदायी आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेरुन येत असते व ती आपल्या घरातील मुख्य दरवाजातून येत असते. त्यामुळे याची तुम्ही काळजी घ्या की मुख्य दरवाजात कचरा कुंडी, अस्वच्छ पायपुसनी किंवा मॅट नाहीये. तसेच हा उपाय तुमच्या घरातील दारिद्र्य, दुर्भाग्य, गरिबी, नकारात्मकता काढून टाकण्यासाठी आहे.
घरातील पायपुसनी जी असते ती मुख्य दरवाजात नेहमी ठेवावी, वरचेवर ती धुवावी, तसेच यासाठी तुरटी लागणार आहे. तुरटी ही फक्त पाण्यातील कचरा बाजूला करत नाही तर आपल्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी वापरू शकतो. तुरटीची पावडर करून ती छोटी डबी हे नेहमी पायपुसनी च्या खाली ठेवा, तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही, गरिबी तर येणारच नाही.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.
अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.