मित्रांनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात. समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या स-मस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल.
स्वामींचे साक्षात दर्शन होण्यासाठी स्वामींचे अनुभव येण्यासाठी आणि सर्व काही मिळण्यासाठी काय करावे लागते. तर हे एक काम करा स्वामींचे साक्षात दर्शन होईल सर्व काही मिळेल स्वामींची कृपा होईल. तुम्ही हे काम रोज करू शकतात आणि खूप सोपे काम आहे. तर आता तुम्हाला करायचे काय आहे तुम्ही जी ही स्वामींची सेवा करत असाल ती तुम्हाला मनापासून करायची आहे विश्वासाने करायच आहे.
अस नाही की कोणचे तरी ऐकले आहे कोणी तरी सांगितल आहे की स्वामी सेवा कर सगळ काही मिळेल तस नाही मनातून जो आवाज येतो तेच आपण करायला पाहिजे अस नाही की तास-तास भर सेवा करतोय मंत्र जप करतोय. फक्त 5 मिनिटे बसा जेही करता येईल ते करा जर काही जमत नसेल काही माहिती नसेल तर फक्त स्वामींच्या मूर्ती समोर बसा आणि मनात कोणतीही गोष्ट ठेऊ नका.
फक्त जे करताय ते मनापासून करा आणि मनापासून स्वामींचे नामस्मरण करा. तुम्ही फक्त 5 मिनिटे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत आहात आणि तो जप मनोभावे करत आहे आणि दुसरी कडे एक- एक तास स्वामींचा जप करत आहे पण एक तास जप करून विश्वास नाही ते जप मनोभावे करत नाही तर काही उपयोग नाही.
जर तुम्हाला स्वामींचे साक्षात दर्शन हवे असतील अनुभव हवे असतील सगळ काही तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणतीही सेवा करत असाल ती मनापासून आणि विश्वासाने करा. 11 माळी, 51 माळी, 101 माळी नाही केल्या तरी चालतील, 1 माळ करा 5 मिनिटे बसा पण अस बसा की तुम्हाला सुद्धा वाटल पाहिजे की काहीतरी तुम्ही आज केला आहे काही तरी शुभ गोष्टी तुम्ही केल्या आहेत तुम्हाला अस जाणवल पाहिजे की दैवीय शक्ती तुमच्या अवती भोवती आहे म्हणून जे कराल ते मनापासून विश्वासाने करा.
अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.