मनुष्याला लाभलेला चेहरा ही त्याला मिळालेली एक प्रकारची नैसर्गिक देणगीच समजली जाते. कारण माणसाचे हास्य, दु:ख, लोभ, पाप, पुण्य, क्रोध यांसारख्या भाव-भावना या चेहऱ्यावरूनच समजतात. चेहऱ्यावर आपले व्यक्तिमत्व अवलंबून असते आणि चेहऱ्यावरूनच बऱ्याच वेळा माणसांची पारख केली जाते.
एवढे महत्व असणाऱ्या चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काळे डाग जर दिसू लागले तर त्या व्यक्तीला अवघडल्यासारखे वाटते, त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वासही कमी व्हायला लागतो. अशावेळी अनेकजण बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध क्रीम्स, पार्लर किंवा इतर औ-षधांचा सर्रास वापर सुरु करतात.
पण या सगळ्या प्रयोगात शरीराला किंवा चेहऱ्याला त्यांचे साईड इफेक्ट्स भोगावे लागु शकतात. चेहऱ्यावर काळे डाग येण्याची प्रमुख कारणे अनुवंशिक, सतत उन्हात फिरणे, हा-र्मोनल बदल, वाढते वय, प्रदूषण ही कारणे असू शकतात, असे अनेक तज्ज्ञांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे.
आपल्या शरीरामध्ये काही असे घटक असतात त्यानें आपल्या शरीराचा रंग चमकदार बनतो. परंतु हा घटक कमी पडल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तेज कमी होत असतं. सर्वात आधी आपल्याला हा घरगुती उपाय करण्यासाठी एक पेस्ट तयार करायची आहे. त्यासाठी टोमॅटो कापून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी मग त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करून घायची आहे.
त्यामध्ये थोडे बेसन पीठ घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावे.कारण हे हळद ,बेसन पीठ आणि टोमॅटो या तीनही पदार्थांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असे पोषक द्रव्ये असतात त्यामुळे आपल्या त्वचेला ही पोषक द्रव्ये मिळून तिला चमकदार बनवतात.
तसेच यामध्ये चिमूटभर मीठ टाकायची आहे. मिठामध्ये सुद्धा अशा काही प्रॉपर्टीज असतात ज्या आहेत त्या शरीराला मदत करत असतात. हे मिश्रण एकजीव करून त्यामध्ये कोरफडीचे जेल टाकायचे आहे कारण कोरफड ही आयुर्वेदात औ-षधी वनस्पती मानली जाते. जिचे गुणधर्म आपल्या चेहऱ्यासाठी खुप उपयुक्त असतात.
हे मिश्रण तयार करून आपल्या शरीरावर आपल्या चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करावी. केल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे. हा उपाय आपल्याला सलग एक महिना करायचा आहे. आपल्याला ही पेस्ट आठवड्यातून एक वेळेस लावायची आहे. यामधील हळद ही शरीरासाठी खुप उपयोगी ठरते. तसेच फक्त कोरफडीचा उपयोग आपली त्वचा चमकवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त ठरते.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.