कल्की अवतार कधी होणार? वेळ जवळ आली आहे का..जाणून घ्या विष्णूच्या कल्की अवाताराचे रहस्य..

अध्यात्म

हिंदू ध-र्माच्या पौराणिक मान्यतेनुसार कल्कीला विष्णूचा अवतार देखील मानण्यात येतो. पौराणिक कथेनुसार कलियुगात पापाची सीमा पार झाल्यानंतर जगात दुष्टांचा संहार करण्यासाठी, कल्कीचा अवतार असेल, आणि ध र्म ग्रंथानुसार कलियुगात भगवान विष्णू कल्कीच्या रूपात अवतार घेईल.

कल्की अवतार कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात होईल, कल्की देव म्हणूनही कल्की यांची ओळख आहे. भगवान विष्णु यांचे १० अवतार महत्वाचे मानले जातात. यात मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्कि अवतार यांचा समावेश आहे. पौराणिक मान्यतांनुसार कल्कीला अवतार घेण्याची वेळ जवळ आली आहे.

कलियुगाच्या सर्वात शेवटच्या चरणात मनुष्याचे आयुष्य सोळा वर्षांचे असेल. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच पुरुष आणि स्त्री समागम करून आपत्य उत्पन्न करतील. पती व पत्नी एकमेकांपासून संतुष्ट राहणार नाहीत. लोक केवळ मांसाहार करतील आणि बकरीचे दुध पिऊ लागतील. गाय दिसणारच नाही. सर्वजण एकमेकाला लुबाडण्याचा प्रयत्न करतील.

व्रत नियमांचे पालन करणार नाहीत. या उलट वेदांची निंदा करतील. स्त्रिया कठोर स्वभावाच्या आणि कटू बोलू लागतील. पतीच्या आज्ञेचे पालन करणार नाहीत. अमावस्या नसतानाही सूर्य ग्रहण लागेल. स्वतःचा देश सोडून इतरांच्या देशात वास्तव्य करणे चांगले वाटू लागेल. कोठेही मंदिर नसतील. युगाच्या अंतामध्ये प्राण्यांची कमतरता जाणवेल. तारकांची चमक कमी होईल. पृथ्वीवर उष्णता वाढेल. अशावेळी सतयुगाचा आरंभ होईल आणि त्या काळातील प्रेरणेपासून भगवान विष्णूंचा कल्की अवतार होईल.

हे वाचा:   घरात या ठिकाणी ठेवा तांदळाने भरलेले मडके; पैशांचा लागेल भला मोठा ढीग.!

श्रीमद् भगवद पुराणातील बाराव्या स्कंदात असे लिहिले आहे की, भगवान कल्की अवतार कलियुगाच्या शेवटी आणि सत्ययुगाच्या संधीकाळात घेतील. ध-र्मग्रंथानुसार भगवान राम आणि श्री कृष्ण यांचा देखील अवतार त्यांच्या सं-बंधित युगाच्या शेवटी झाला होता. म्हणूनच, कलियुगाचा अंत जवळ आल्यावर भगवान कल्कीचा ज न्म होईल.

शास्त्रात कल्की अवतार सं-बंधित श्लोकाचा उल्लेख आहे, ज्यामध्ये असे दिसून येते की कलियुगात देवाचा कल्की अवतार केव्हा आणि कोठे असेल आणि त्याचे वडील कोण असतील? सम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणास्यमहात्मन। भगवनविष्णुयशसः कल्कि प्रादुर्भाविष्यति।।

अर्थात, भगवान कल्की यांचा ज न्म संभळ गावात विष्णूयश नावाच्या एका श्रेष्ठ ब्राह्मणाच्या मुलाच्या रुपात होईल. देवदत्त नावाच्या घोड्यावर ते तलवारीने दुष्टांचा नाश करतील, तेव्हाच सत्ययुग प्रारंभ होईल. भगवान विष्णूचा कल्की अवतार मिस्सकलंक अवतार म्हणूनही ओळखला जाईल. या अवतारात, त्यांच्या आईचे नाव सुमती असेल. याव्यतिरिक्त त्यांना तीन मोठे भाऊही असतील.

हे वाचा:   शुक्रवारी तांदळाच्या डब्यात ठेवा ही एक वस्तू; मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल, होईल अचानक लाभ.!

ते सुमंत, प्राज्ञ आणि कवि म्हणून ओळखले जातील. यज्ञवल्क्य हे पुजारी आणि भगवान परशुराम हे त्यांचे गुरु असतील. भगवान कल्की यांच्या लक्ष्मी रुपी पद्मा आणि वैष्णवी रुपी रमा अशा दोन पत्नी असतील. त्यांची मुले जय, विजय, मेघमाल आणि बलाहक असतील. पुराणात असे सांगितले गेले आहे की, कलियुगाच्या शेवटी हे अवतार होतील आणि ते अधर्मींचा अंत करुन पुन्हा एकदा ध-र्माचे राज्य स्थापित करतील. सध्या कलियुगाचा अजूनही वेळ बाकी आहे. त्यामुळे हा अवतार होण्यासाठी बराच वेळ आहे. आता आम्ही आणि आपण फक्त पृथ्वीच्या उन्नतीसाठी कल्की देव ज न्म घेण्यासाठी प्रार्थना करू शकतो.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.