नमस्कार मित्रांनो..
श्री स्वामी समर्थाची पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू व आकाश या पंचमहाभुतांवर सत्ता होती. श्री समर्थ हे जगद्गुरू जात-पात-धर्म या सर्वाच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले. त्यांच्या तोंडी वेदमंत्र, दोहे, गीतेतील संस्कृत श्लोक नेहमी असत. सामाजिक भेदाभेद दूर करण्याचे विचार श्री स्वामींनी केवळ मनात बाळगले नव्हते तर ते प्रत्यक्ष कृतीत आणले होते.
स्वामी समर्थ अक्कलकोटचे एक अवतारी पुरुष होऊन गेले , तसेच स्वामींना दिगंबर दत्ताचा अवतार देखील मानतात. परंतु जे लोक असे कृत्य करतात, या प्रकारच्या लोकांना स्वामी कधीच प्रसन्न होत नाहीत. या लोकांच्या चुका अक्ष्यम्य असतात.
काही लोक साधं फक्त नामस्मरण करतात, रोज प्रामाणिक कष्ट करतात, अशा लोकांवर देव लगेच प्रसन्न होतो. अशावेळी देवाला आपली काळजी असते, म्हणून देव अशा भक्तांच्या पाठीशी कायम राहतो. जे लोक भयंकर स्वार्थी असतात, स्वतःच्या फक्त फा-यद्याचा विचार करतात, इतरांना सतत अपमानित करतात असे लोकांना स्वामी कधीच साथ देत नाहीत.
श्री स्वामी महाराजांनी ३५० वर्षापूर्वी लिहलेली भविष्यवाणी आज साक्षात खरी ठरत आहे. काय होती ती भविष्यावाणी ती आज आपण पहाणार आहोत.
युद्धाकारण पृथ्वी वरती, विषवायू पसरेल. असंख्य जीव ते विषवायूने प्राणासी मुकतील. युद्धकारण पृथ्वीवरती प्रदूषण फैलावले. अनेक दशके या परिणामे मानव त्रासावेल. रोगी-खुजी निकष्ट अशी प्रजोत्पती होईल, पृथ्वीवरचे व्यवहार सारे पहा बंद पडतील.
सज्जन सारे पृथ्वीवरचे गिरी कंदरि दडतील. त्यांचे योगे कुठे कुठे ही मानव जात दिसेल. चातुवण्य नष्ट होउनी, जा त-पात बुडतील. नुतन वर्णी नवीन जाती पुन्हा परत येतील प्रजातंत्र राज्यपद्धती सर्व लया जाईल. राजा शासन राज्यपद्धती पुन्हा पहा येईल.
श्री स्वामी समर्थ महाराजांनी केलेली ही भविष्यवाणी आजच्या काळात ही तंतोतंत जुळत आहे. स्वामी हे सर्व गामी आहेत पुढे काय होणार आहे ते स्वामींना अगोदरच कळत असत. त्यामुळे स्वामींचे नामस्मरण करा स्वामींचा मंत्र जप करा आणि स्वामींची पूजा अर्चना करा त्यामुळे स्वामी आपल्याला प्रसन्न होतील व स्वामींची कृपा दृष्टी आपल्यावर राहील.
असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.